तीर्थस्थळांना गोंदियाशी जोडावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:42+5:302021-04-04T04:29:42+5:30
गोंदिया : जबलपूर ते गोंदियापर्यंत काही प्रवासी रेल्वे गाड्यांचा विस्तार करण्यात आला तर गोंदिया, बालाघाट व नैनपूर येथील नागरिकांना ...
गोंदिया : जबलपूर ते गोंदियापर्यंत काही प्रवासी रेल्वे गाड्यांचा विस्तार करण्यात आला तर गोंदिया, बालाघाट व नैनपूर येथील नागरिकांना अनेक तीर्थस्थळांचा लाभ घेता येईल. याकरिता जबलपूर ते गोंदियापर्यंत प्रवासी रेल्वे गाड्यांचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
वैष्णोदेवी कटरा गाडी, गोंडवाना एक्स्प्रेस हजरत निजामुद्दीन, जबलपूर अटारी एक्स्प्रेस आदी गाड्या जबलपूरपर्यंतच चालतात. या गाड्यांचा विस्तार गोंदियापर्यंत झाला तर गोंदिया, बालाघाट व नैनपूर येथील नागरिक वैष्णोदेवी, कटरा दर्शन, हरिव्दार, इंदूर, व्यास, अमृतसर, अटारी या तीर्थस्थळांचा लाभ घेऊ शकतील. याकरिता या गाड्यांचा गोंदियापर्यंत विस्तार करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीने केली आहे. रेल्वेमंत्री गोयल यांना तसे पत्र पाठविले आहे. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सूरज नशीने, दिव्या भगत-पारधी, जसपालसिंह चावला, लक्ष्मण लधानी, राजेंद्र कावळे, स्मिता शरणागत, हरिश अग्रवाल, छैलबिहारी अग्रवाल, अखिल नायक, भेलूमन गोपलानी आदी उपस्थित होते.