ग्राम रोजगार सेवक नरेगाचा आधारस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:12 PM2018-01-15T22:12:00+5:302018-01-15T22:12:23+5:30
ग्राम रोजगार सेवक हा नरेगाचा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन कार्यक्रम अधिकारी श्रृती सिंग यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
तिरोडा : ग्राम रोजगार सेवक हा नरेगाचा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन कार्यक्रम अधिकारी श्रृती सिंग यांनी केले.
तालुक्यातील लाखेगाव, पांजरा, मुंडीकोटा येथील महाराष्टÑ रोजगार हमी योजनेच्या कामावर नरेगाच्या केंद्रीय चमूने भेट दिली. या वेळी त्या बोलत होत्या. सदर चमूमध्ये कार्यक्रम अधिकारी श्रृतीसिंग यांच्यासह कार्यक्रम अधिकारी अनिलकुमार कट्टा, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी (उपायुक्त कार्यालय नागपूर) सुनील निकम, भांडारकर, उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे, तहसीलदार संजय रामटेके, खंड विकास अधिकारी जावेद इनामदार, रोशन दुबे, सुरेश निमजे, आर.जे. बन्सोड, नेताजी धारगाये, गौतम, हटवार, तिडके, एल.एस. बाळणे, सरपंच कमलेश आथीलकर, पांजराचे सरपंच राजेंद्र चामट व लाखेगावच्या सरपंच चित्रलेखा चौधरी उपस्थित होते.
या वेळी केंद्रीय चमूने तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेतील कामांना भेट दिली. कामावर असलेल्या मजुरांशी संवाद साधला. मजुरी वेळेवर मिळत आहे काय, या संदर्भात चर्चा केली. नंतर कामावर आलेल्या मजुरांच्या जॉबकार्ड संदर्भात सखोल चर्चा केली. शेवटी ग्रामपंचायतमधील रोहयो योजनेमधून मंजूर झालेल्या कामांची नोंदवही व ग्रामसभेचा ठराव याची शहानिशा केला. तसेच नोंदवही संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.