पिंपळ, वडाची रोपवाटिका मुरदोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:17 AM2018-01-31T00:17:06+5:302018-01-31T00:17:32+5:30

तालुक्यातील मुरदोली मध्यवर्ती रोपवाटीकेत पिंपळ आणि वडाच्या रोपवाटीकेचे काम सुरु आहे. या रोपवाटीकेत आत्तापर्यंत चार हजार रोपटे तयार करण्यात आली आहे. वड आणि पिंपळाचे रोपटे तयार करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

Pimpal, Vada's nursery, Murdoelyat | पिंपळ, वडाची रोपवाटिका मुरदोलीत

पिंपळ, वडाची रोपवाटिका मुरदोलीत

Next
ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोग : विविध भागात होणार पुरवठा, प्रयोगाचे सर्वत्र कौतुक

दिलीप चव्हाण ।
ऑनलाईन लोकमत
गोरेगाव : तालुक्यातील मुरदोली मध्यवर्ती रोपवाटीकेत पिंपळ आणि वडाच्या रोपवाटीकेचे काम सुरु आहे. या रोपवाटीकेत आत्तापर्यंत चार हजार रोपटे तयार करण्यात आली आहे. वड आणि पिंपळाचे रोपटे तयार करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
विशेष म्हणजे पिंपळ व वडाचे रोपटे जगत नाही तर पक्ष्यांनी पिंपळ व वडाचे बियाणे खाल्यावर जी विष्ठा बाहेर पडते त्या विष्ठेतूनच पिंपळ व वडाचे झाड तयार होत असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे पिंपळ व वडाचे रोप लावण्याचा प्रयोग कधीच रोपवाटीकेत आत्तापर्यंत यशस्वी झालेला नाही.मुरदोलीच्या रोपवाटिेकेत हा प्रयोग यशस्वीपणे करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठी रोपवाटिका मुरदोली येथे आहे. घनदाट जंगलात ही रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. या रोपवाटिकेची देखरेख वनरक्षक डी.बी. तुरकर वनक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. वनरक्षक डी.बी. तुरकर यांच्या कार्यकुशलतेमुळे पिंपळ व वडाचे रोपटे तयार करुन जगविण्यात यश आले आहे. या रोपवाटिकेत सागवान, बांबू, हिरडा, बेहळा, आंजन, जांभुळ, सिताफळ, सिसू, खैरे, सिसम, मोहाई, सिवन, पारस, पिंपळ, अमलतास, कवट, आपटा, आंबा, विजा, गुलमोहर, बदाम, सासा, करु, सिरस, रिठा, सिंदूर, उतरणजीवा, चिंच, कंरजी, चार, बेल, वड असे एकूण २ लाख ७२ हजार सहाशे पंचवीस रोपटे तयार करण्यात आले आहे.

२०१६-१७ या वर्षात वडाचे ३२०० व पिंपळाचे ८०० रोपटे जगविण्यात आली आहे. या रोपट्यांचे संवर्धन वनविभागाने केले आहे. वड व पिंपळाचे रोपटे जगविल्याने जगत नाही मात्र आमच्या टिम वर्कमुळे ते यशस्वी झाले आहे. यासाठी वनसंरक्षक गोंदियाचे एस.युवराज, सहायक वनसंरक्षक एन.एच. शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
-एस.एम. जाधव
वनक्षेत्राधिकारी, गोरेगाव.

असे तयार होते रोपटे
वड आणि पिंपळाचे पिकलेले फळ सुखविले जाते. बियाणे सुखल्यानंतर वाफे तयार केले जाते व त्या वाफ्यांमध्ये ताजे शेण व बियाणे मिश्रन करुन टाकण्यात येते. या प्रक्रियेनंतर पाच दिवस पाणी दिले जात नाही. सहाव्या दिवशी वाफ्यावर पाणी टाकून गवताने झाकले जाते. २० ते २५ दिवसात अंकुर आल्यावर रुट ट्रेनर ब्लॉकमध्ये ते रोप जगविले जाते. एक महिन्यानंतर रोपटे पालीथिनमध्ये मातीच्या मिश्रणात घेतले जाते. वड व पिंपळाचे झाड बियाणांपासून जगविण्यासाठी तशी वातावरण निर्मितीही केली जाते. वड व पिंपळाचे बियाणे जानेवारी ते मार्चपर्यंतच उपलब्ध असतात. अतिसुक्ष्म बियाणे हाताळतांना खूप काळजी घ्यावी लागते हे विशेष.
पक्ष्यांसाठी पाण्याची सोय
मुरदोली जंगल परिसरातील पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. मुरदोली रोपवाटिकेत ठिकठिकाणी पाण्याचे पॉट लावण्यात आले.

Web Title: Pimpal, Vada's nursery, Murdoelyat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.