परवानगी न घेता पाईप तोडणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:14 PM2018-08-27T22:14:27+5:302018-08-27T22:14:44+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता पुलाचे पाईप तोडणे अर्जुनी ग्रामपंचायतला चांगलेच महागात पडले. पाईप तोडल्याप्रकरणी बांधकाम विभागाने ३४ हजार रुपये भरण्याचे आदेश ग्रामपंचयातला दिले आहे.

Pipe chop without taking permission | परवानगी न घेता पाईप तोडणे भोवले

परवानगी न घेता पाईप तोडणे भोवले

Next
ठळक मुद्दे३४ हजार रुपये भरण्याचे आदेश : लोकमतच्या वृत्ताची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता पुलाचे पाईप तोडणे अर्जुनी ग्रामपंचायतला चांगलेच महागात पडले. पाईप तोडल्याप्रकरणी बांधकाम विभागाने ३४ हजार रुपये भरण्याचे आदेश ग्रामपंचयातला दिले आहे.
तिरोडा-अर्जुनी खैरलांजी मार्गावरील अर्जुनी नाल्याच्या पुलावरील सुरक्षा पाईप १३ ते १५ मीटर ग्रामपंचायतने परवानगी न घेताच तोडले. तसेच रस्त्याच्या बाजूला जेसीबी लावून खड्डा खोदला होता.त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
पाईप तोडणाऱ्या कंत्राटदार व ग्रामपंचायतवर कारवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच महेंद्र बागळे, ग्रा.पं.सदस्य रमेश अंबुले यांनी केली होती. त्यानंतर लोकमतने यासंबंधीची बातमी २३ आॅगस्टला प्रकाशीत केली होती. याची दखल घेत तिरोडा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक उपविभागीय अभियंता यांनी दखल घेत कनिष्ठ अभियंता यांच्यामार्फत मौका चौकशी केली. त्यांनी चौकशी अहवाल सादर केला. अहवालावरुन पाईपची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणीे ३४ हजार रुपये भरण्याचे पत्र अर्जुनीचे ग्रामसेवक यांना दिल्याचे उपविभागीय अभियंता शाहु यांनी सांगितले. याची एक प्रत कार्यकारी अभियंता यांच्याकडे कारवाहीसाठी पाठविली आहे. दरम्यान ग्रामसेवकाच्या हाती ३४ हजार रुपये भरण्याचे पत्र मिळताच एकच खळबळ उडाली आहे.अर्जुनी ग्रामपंचायतला पाणी पुरवठा विभागातर्फे देखभाल दुरूस्तीचे ४ लाख रुपयांचे काम मंजुर करण्यात आले असल्याचे कनिष्ठ अभियंता प्रशांत टेंभुर्णीकर यांनी सांगीतले. त्याचेच काम ग्रामपंचायतमार्फत सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान ग्रामपंचायतर्फे सुरू असलेल्या कामाची चौकशी झाल्यानंतर त्यांना कामाचे बिल देण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शाहू यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत व कंत्राटदाराने शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतला नुकसान भरपाईपोटी ३४ हजार रुपये भरण्याचे पत्र दिले आहे. ग्रामपंचायतने पैसे न भरल्यास कार्यकारी अभियंताच्या निर्देशानुसार पुढील कारवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Pipe chop without taking permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.