योजना गरजूंच्या दारापर्यंत

By admin | Published: August 17, 2015 01:41 AM2015-08-17T01:41:17+5:302015-08-17T01:41:17+5:30

राजकारणाच्या सारीपाटातील विजयी सदस्यांनी आपसातील पक्षीय वैमनस्य बाजूला सारून समाजकारणासाठी अधिकाधिक वेळ द्यावा.

The plan is to the door of the needy | योजना गरजूंच्या दारापर्यंत

योजना गरजूंच्या दारापर्यंत

Next

नावीन्यपूर्ण उपक्रम : शिवणयंत्र व विद्युत मोटारपंपाचे हस्तांतरण
बोंडगावदेवी : राजकारणाच्या सारीपाटातील विजयी सदस्यांनी आपसातील पक्षीय वैमनस्य बाजूला सारून समाजकारणासाठी अधिकाधिक वेळ द्यावा. विकास कार्यात गटबाजी आड येणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना खऱ्या गरजूंच्या दारापर्यंत १०० टक्के कार्यान्वित करण्यासाठी अग्रक्रमाने प्राध्यान्य देणार, अशी ग्वाही अर्जनी-मोरगाव पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी दिली.
पंचायत समितीच्या बचत भवनात तालुक्यातील आजी-माजी जि.प. पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन व सत्कार समारंभ पार पडले. याप्रसंगी योजना गरजूंच्या दारापर्यंत या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पं.स. सभापती अरविंद शिवणकर होते. अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष तसेच अर्थ व बांधकाम सभापती रचना गहाणे, पं.स. उपसभापती आशा झिलपे, माजी सभापती प्रकाश गहाणे, जि.प. सदस्य गिरीश पालिवाल, किशोर तरोणे, भास्कर आत्राम, मंदा कुंभरे, माजी जि.प. सदस्य मधू मरस्कोल्हे उपस्थित होते.
सभापती शिवणकर पुढे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी एकोप्याने सहकार्य करणे गरजेचे आहे. तालुक्यात भेडसावणाऱ्या विविध समस्या कायमच्या मार्गी लावण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचे कार्य तालुक्यातील जि.प. सदस्य व पदाधिकाऱ्यांनी करून विकास कार्यात हातभार लावावे, असे ते म्हणाले.
या वेळी तालुक्यातील विद्यमान जि.प. पदाधिकारी रचना गहाणे, गिरीश पालिवाल, किशोर तरोणे, भास्कर आत्राम, मंदा कुंभरे तसेच माजी पदाधिकारी प्रकाश गहाणे, मधू मरस्कोल्हे, गोपीनाथ लंजे यांचा सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात गावची शाळा-आमची शाळा प्रकल्पांतर्गत प्रभागस्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक व शाळा समितीच्या अध्यक्षांना रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जि.प. समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुदानावर विद्युत मोटार पंपांचे लाभार्थ्यांना तसेच जि.प. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने शिवणयंत्रांचे १२ महिला लाभार्थ्यांना हस्तांतरण सभापती शिवणकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, उपसभापती आशा झिलपे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी प्रकाश उरकुडे, संचालन सहायक गटविकास अधिकारी राजू वलथरे यांनी तर आभार मुलचंद राठोड यांनी मानले. कार्यक्रमात पं.स. सदस्य प्रेमलाल गेडाम, होमराज कोरेटील, नानाजी मेश्राम, जनार्दन काळसर्पे, रामलाल मुंगणकर, शिशुला हलमारे, नाजुका कुंभरे, करूणा नांदगाये, जयश्री पंधरे, अर्चना राऊत, टी.पी. कचरे, जगताप, नेताम, राजू वलथरे, चित्र ठेंगडी, कक्ष अधिकारी कापगते, पशुधन विभागाचे लुटे, बारापात्रे, बालविकास प्रकल्पाचे निशा आगाशे, कृषी विभागाचे रामटेके उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: The plan is to the door of the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.