‘त्या’ तीन कर्मचाऱ्यांना जाळण्याची होती योजना

By Admin | Published: July 10, 2015 01:44 AM2015-07-10T01:44:22+5:302015-07-10T01:44:22+5:30

चंगेरा येथील दगावलेल्या बालकामुळे तेथील लोकांनी तेथील नियमीत आरोग्य सेविका,

The plan was to burn those 'three employees' | ‘त्या’ तीन कर्मचाऱ्यांना जाळण्याची होती योजना

‘त्या’ तीन कर्मचाऱ्यांना जाळण्याची होती योजना

googlenewsNext

गोंदिया : चंगेरा येथील दगावलेल्या बालकामुळे तेथील लोकांनी तेथील नियमीत आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका व आरोग्य सेवकाला बुधवारी (दि.८) दुपारी २.३० वाजता दरम्यान बेदम मारहाण केली. त्यांच्या खुर्च्यांची तोडफोड करून व्हॅक्सीनच्या डब्याने कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यांनतर त्यांना जाळण्यासाठी तेथील लोकांनी रॉकेल आणले होते. परंतु हे कृत्य करण्याच्या बेतात असतानाच रावणवाडी पोलीस तेथे पोहचल्याने हा अनर्थ टळला.
चंगेरा येथील सायना जमीर मिर्झा (२७) या महिलेची बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात मंगळवारी प्रसूती झाली. बुधवारी तिला सुट्टी देण्यात आली, परंतु बाळाची प्रकृती बरी नसल्यामुळे नवजात शिशू अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले होते. परंतु घरच्यांनी त्या बाळाला उपचार होऊ न देता घरी नेले. चंगेरा येथील आंगणवाडीत शिबिर सुरू असताना पोलीओ व बीसीजी लसीकरण तीन बालकांना करण्यात आले. इतर बालकांना दुसरे लसीकरण करण्यात आले. यातील फक्त सायनाच्या बाळाची प्रकृती खालावली. डॉक्टरानी त्यांना गंगाबाई स्त्री रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी गंगाबाईत न नेता रजेगाव (मध्यप्रदेश) येथे नेले. त्या बाळासोबत आरोग्य सेविका होती.
दरम्यान घरच्यांनी फोनद्वारे बाळ दगावल्याची माहिती देताच चंगेरा येथील काही लोकांनी जमाव करून आरोग्य सेविका साधना लांजेवार, कंत्राटी अरोग्य सेविका छाया गायकवाड व आरोग्य सेवक सुर्यभान नागदेव यांना हातात मिळेल त्या वस्तूने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांना व्हेक्सीनच्या डब्यांनी मारहाण केल्यामुळे व्हेक्सीनचे डबे फुटले. विशेष म्हणजे, बेदम मारहाणीनंतर त्यांना जाळून टाकण्याचा मारेकऱ्यांचा बेत होता व यासाठी त्यांनी तेथे रॉकेल आणले होते. मात्र वेळीच रावणवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यामुळे हा अनर्थ टळला.
या मारहाणीचा निषेध नोंदवित अन्य आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि.९) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करून पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, तालुका वैद्यकीय अधिकारी तथा मॅग्मो चे जिल्हाध्यक्ष डॉ. चंदू वंजारे, गोंदियाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, आर. डी. त्रिपाठी, डॉ. विनोद चव्हाण, डॉ, वेदप्रकाश चोरागडे, आरोग्य पर्यवेक्षक सतीश कांबळे व सर्व आरोग्य सेवक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
तक्रार करूनही गुन्हा दाखल नाही
मारहाण करण्यात आलेल्या तिन्ही आरोग्य कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्यां विरोधात रावणवाडी पोलिसांत तक्रार केली. गुरूवारी सायंकाळ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. रावणवाडी पोलीस या प्रकरणातील आरोपींना संरक्षण देत आहे, असा आरोप करीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी गुरूवारी दुपारी पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने त्यांचा पदभार सांभाळणारे सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांना निवेदन देण्यात आले. आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करू असे आश्वासन त्यांनी निवेदनकर्त्यांना दिले.

Web Title: The plan was to burn those 'three employees'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.