ग्रामसभेत वृक्ष लागवड आराखड्याचे नियोजन
By admin | Published: June 26, 2016 01:39 AM2016-06-26T01:39:06+5:302016-06-26T01:39:06+5:30
ग्रामपंचायत सावरी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आवर्जुन उपस्थित होते.
सीईओंची उपस्थिती : शाळेकरिता दिले १० हजार ५०० वृक्ष
गोंदिया : ग्रामपंचायत सावरी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आवर्जुन उपस्थित होते. यावेळी वृक्ष लागवडीच्या कृतिबद्ध आराखड्याचे नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी पुलकुंडवार यांनी ग्रामसभेचे महत्त्व पटवून दिले. मानवाला प्राणवायूची गरज असते, तो वृक्षांपासून मिळतो. सन २०१९ पर्यंत आपल्याला ५० कोटी वृक्ष लावायचे आहेत. मराठवाड्यात पाणी नाही म्हणून मुलगी देत नाही. अशी वेळ गोंदियावासीयांवर येवू नये, असे त्यांची सांगितले.
आपल्या मार्गदर्शनात पं.स. चे विस्तार अधिकारी रवींद्र पराते म्हणाले, झुडपी जंगले असून त्या ठिकाणी झाडे नाहीत. त्यामुळे पाणी जिरत नाही. त्यासाठी झाडे लावणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी, एक विद्यार्थी एक झाड लावावे. शाळेकरिता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १० हजार ५०० झाडे दिल्याचे सांगितले.
ग्रामसभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पुलकुंडवार यांच्यासह गटविकास अधिकारी एस.के. वालकर, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र भांडारकर, सरपंच डुलेश्वरी पटले, उपसरपंच नरेंद्र चिखलोंडे, सदस्य प्रेमचंद बिसेन, पप्पू पटले, माजी सदस्य गजभिये आदी उपस्थित होते. या ग्रामसभेला जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी उपस्थित लावल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याकडे काही व्यथाही मांडल्या. सभेचे संचालन के.एस. शेंदूरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ५० टक्के महिला आरक्षणाचा आधार घेवून महिलांना बोलण्याची संधी दिली. त्यामुळे आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही, असे सांगून काही पुरूषांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)