महाविद्यालयात औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:31+5:302021-06-25T04:21:31+5:30
ग्रामीण भागात महाभृंगराजची रोपे सहज उपलब्ध होतात; परंतु सर्वांना या वनस्पतीची ओळख नसल्यामुळे वापर होत नाही. महाविद्यालयात एकूण ...
ग्रामीण भागात महाभृंगराजची रोपे सहज उपलब्ध होतात; परंतु सर्वांना या वनस्पतीची ओळख नसल्यामुळे वापर होत नाही. महाविद्यालयात एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी जवळपास ७० टक्के मुलींची संख्या आहे. निदान महाविद्यालयातील विशेषतः विद्यार्थिनींना, तसेच विद्यार्थांना आपल्या परिसरातील या महत्त्वाच्या औषधीयुक्त वनस्पतीची ओळख व्हावी आणि त्याचा वापर त्यांनी केसांना लावावयाच्या तेलाच्या स्वरूपात करावे, हा उद्देश ठेवून महाविद्यालय परिसरात महाभृंगराज वनस्पतीची लागवड करण्यात आली. या वनस्पतीपासून तयार झालेल्या तेलामुळे केसांचे अकाली पांढरे होणे थांबते, तसेच केसांमधील कोंढा होणेसुद्धा थांबते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. यासोबतच या वनस्पतीचे अनेक उपयोग सांगितले जातात. वृक्षलागवडप्रसंगी प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल यांच्यासह महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. अजय राऊत, मुख्य लिपिक कविता वासनिक, लेखापाल अरुण मुंडले, सुधाकर नागपुरे, परिचर संजय शेंडे, नितीन सिडाम, बादल लाडे, दिलीप लाडे, तसेच गजानन कोल्हे उपस्थित होते.
===Photopath===
240621\1839-img-20210624-wa0015.jpg
===Caption===
औषधी वनस्पतींचे रोपण करत असतांना प्राचार्य डॉ चंदेल