रस्त्याच्या मधोमध वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:56 PM2018-07-20T23:56:34+5:302018-07-20T23:57:26+5:30

तिरोडा तालुक्यातील ग्राम घोगरा व देव्हाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भर उन्हाळ्यात जड वाहनाच्या ये-जामुळे रस्ते फुटले असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.

Planting the middle of the road | रस्त्याच्या मधोमध वृक्ष लागवड

रस्त्याच्या मधोमध वृक्ष लागवड

googlenewsNext
ठळक मुद्देरस्ता बंद करण्याचा इशारा : प्रशासनाच्या विरोधात अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्यातील ग्राम घोगरा व देव्हाडा येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भर उन्हाळ्यात जड वाहनाच्या ये-जामुळे रस्ते फुटले असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.
पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था खूप वाईट असते. त्यामुळे पावसाळ्यात बसेस बंद असतात. जनता व विद्यार्थ्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागतो. घाटकुरोडा, घोगरा व देव्हाडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करुन रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आजपर्यंत कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. या रस्त्याचे काम १२ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सडक योजनेतून करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावरुन पाच रेतीघाट पडतात. यात घाटकुरोड्याचे दोन व ग्राम चांदोरी, बिरोली आणि मुंडीपार येथील प्रत्येकी एक. या घाटावरील रेती वाहून नेणाऱ्या जड वाहनांची संख्या ५०० ते ५५० च्यावर असून सातत्याने वर्दळ असल्याने रस्त्याचे पूर्ण बेहाल झाले आहे.
रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने उन्हाळ्यात धूळ घरात जाते. पावसाळ्यातील खड्ड्यात साचलेले पाणी लोकांच्या अंगावर व घरात शिरत आहे. तरी प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित झाला आहे. रेतीघाटच्या कंत्राटदारांना बोलण्याचा प्रयत्न गावकरी करतात तर त्यांच्याशी अरेरावीपणा केली जाते, अशी माहिती जि.प. सदस्य डोंगरे, घोगराच्या सरपंच गीता देव्हारे, पोलीस पाटील चंद्रºहास भांडारकर, उपसरपंच रुपेश भोंडेकर यांनी दिली.
रस्त्याच्या दयनिय स्थितीमुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये तिरोडा, घाटकुरोडा-घोगरा मार्गे देव्हाड्याला जाणारी एसटी बस बंद केली जाते. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची फजिती होते. शासनाचे लक्ष केंद्रीत व्हावे, याकरिता जि.प. सदस्य डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये एक उपक्रम राबविण्यात आला. रस्त्यावर मोठ्या स्वरुपाचे खड्डे तयार झाले असून त्या खड्यांत वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच देव्हारे, तंमुस अध्यक्ष सुरेश भांडारकर, ग्रा.पं. सदस्य गंगाधर भांडारकर, उपसरपंच रुपेश भोंडेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
...तर संपूर्ण रस्त्यावर वृक्षारोपण
जिल्हा व तालुका प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. रस्ते नव्याने बनविण्यात आले नाही तर रस्त्यावर पडलेल्या संपूर्ण खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन संपूर्ण रस्ता बंद करु, असा इशारा जि.प. सदस्य डोंगरे, सरपंच देव्हारे, उपसरपंच भोंडेकर व इतर पदाधिकाºयांनी दिला आहे.
कंत्राटदाराची अरेरावी, प्रशासन सुस्त
कंत्राटदार आणि महसूल विभागाचे सोटेलोटे असल्याने तसेच काही स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने जनतेच्या समस्या व मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. तहसीलदार, एस.डी.ओ. यांच्यासह अनेकांना पैशाचा पुरवठा होत असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही, असा आरोप जि.प. सदस्य डोंगरे व इतर ग्राम पदाधिकाºयांनी केला आहे. एका वर्षात १० ते २० ट्रॅक्टरवर कारवाई केली जाते. मात्र एकाही जेसीबी मशीन धारकांवर कारवाई केली जात नाही.

Web Title: Planting the middle of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस