प्लाझ्मा युनिटला पडला डोनर्सचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 05:00 AM2020-12-20T05:00:00+5:302020-12-20T05:00:22+5:30
अशात उपलब्ध झालेल्या १० बॅग मधील ५ बॅग वितरीत सुद्धा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, प्लाझ्माला मागणी असतानाच डोनर मिळत नसल्याने मात्र प्लाझ्मा युनिटपुढे डोनर्सचा प्रश्न उभा आहे. अशात कोरोना मुक्त झालेल्यांनी आता जीवदानाच्या महाकार्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्हयात मध्यंतरी कोरोना बाधित व मृतांची संख्या झपाट्याने वाढली होती. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी १३२८९ वर पोहचली असून मृतांची संक्या १७५ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना उपचारातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर २८ दिवस किंवा ३ महिन्यांच्या आतील व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पात्र असतो. अशात जिल्ह्यातील ऑक्टोबर, नोव्हेंबर व सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यातील १८ दिवस ग्राह्य धरल्यास सुमारे ७७२९ व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पात्र दिसून येत आहेत. मात्र जिल्ह्याची शोकांतिका अशी की, येथील प्लाझ्मा युनिटमध्ये आतापर्यंत फक्त ५ व्यक्तींनीच प्लाझ्मा डोनेट केले आहे. अशात उपलब्ध झालेल्या १० बॅग मधील ५ बॅग वितरीत सुद्धा करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, प्लाझ्माला मागणी असतानाच डोनर मिळत नसल्याने मात्र प्लाझ्मा युनिटपुढे डोनर्सचा प्रश्न उभा आहे. अशात कोरोना मुक्त झालेल्यांनी आता जीवदानाच्या महाकार्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिल्हयात मध्यंतरी कोरोना बाधित व मृतांची संख्या झपाट्याने वाढली होती. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी १३२८९ वर पोहचली असून मृतांची संक्या १७५ झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कोरोना मुक्तीचा दर ९५.२४ टक्के असून हा आकडा दिलासादायक असतानाच मात्र एकही मृत्यू होणे ही बाब मात्र गंभीर आहे. अशात वेळीच गंभीर रूग्णाला प्लाझ्मा दिल्यास त्याचे जीवन वाचविण्याची शक्यता वाढून जाते. यामुळेच आजघडीला प्लाझ्मा दान हेच गंभीर रूग्णांसाठी जीवदान ठरत आहे. म्हणूनच मध्यंतरी झालेला कोरोनाचा स्फोट बघता आरोग्य यंत्रणा व जिल्हावासीयांकडून प्लाझ्मा युनिट सुरू व्हावे अशी मागणी जोर धरू लागली होती.
यावर जिल्ह्याला प्लाझ्मा युनिट देण्यात आले व ७ डिसेंबरपासून प्लाझ्मा युनिट कार्यान्वीत झाले आहे. मात्र शोकांतीका अशी की, आतापर्यंत युनिटमध्ये फक्त ५ व्यक्तींनीच प्लाझ्मा डोनेट केले आहे. यातील ३ आरोग्य कर्मचारी असून २ इतर आहेत. या ५ व्यक्तींकडून उपलब्ध झालेल्या १० बॅग मधील ५ बॅग वितरीत करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच, जिल्ह्यात गंभीर रूग्णांसाठी प्लाझ्माची मागणी सुरू झाल्याचे दिसते. अशात प्लाझ्मा युनिटकडे डोनर असल्यास गंभीर रूग्णांसाठी प्लाझ्मा देता येणार. मात्र ५ डोनर्सनंतर प्लाझ्मा युनिटकडे डोनरच नाही. अशात मात्र गंभीर रूग्णांसाठी प्लाझ्माची मागणी वाढल्यास प्लाझ्मा युनिट त्यांना प्लाझ्मा देऊ शकणार नाही व अशात एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकरता येत नाही. मात्र डोनर नसल्याने प्लाझ्मा युनिटला डोनर्स कोठून आणायचे असा प्रश्न पडला आहे.
१५ दिवसांत करता येते प्लाझ्मा डोनेट
एखाद्या व्यक्तीने प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर त्या व्यक्तीला १५ दिवसांनी पुन्हा प्लाझ्मा डोनेट करता येते व त्यामुळे त्या व्यक्तीला कुठलाही धोका नाही. तर रक्तदान केल्यानंतर ३ महिने रक्तदान करता येत नाही. अशात प्लाझ्मा डोनेट करून कोरोनामुक्त झालेली व्यक्ती गंभीर रूग्णांसाठी देवदूतच ठरणार आहेत. यासाठी मात्र अशा व्यक्तींनी आता स्वेच्छेने प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढाकार घेऊन जीनदानाच्या कार्यात सहभाग घ्यावा असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व रक्त केंद्राचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात सुमारे ७७२९ कोरोना मुक्त
कोरोेनातून बरे होऊन डिस्चार्ज झाल्यानंतर ती व्यक्ती २८ दिवसांनी तसेच ३ महिने प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पात्र असते. अशात २८ दिवस झालेल्या व्यक्तीच्या शरीरात जास्त प्रमाणात एंटीबॉडीज असतात. तरिही जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ३९९८, नोव्हेंबर महिन्यात २११८ तर डिसेंबर महिन्यातील १८ दिवसांत १६१३ म्हणजेच एकूण ७७२९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील ५० टक्के रूग्ण वयोवृद्ध गृहीत धरले तरिही उरलेल्या ३८६४ व्यक्तींनी प्लाझ्मा डोनेट केल्यास त्यापासून नक्कीच गंभीर रूग्णांचा जीव वाचविता येणार आहे. अशात कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी या जीवदानाच्या कार्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.