प्लास्टिकबंदी मोहिमेतून १.६५ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:00 AM2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:07+5:30
प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून येत आहे. तरिही मानवाकडून प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करताना नगर परिषदेच्या पथकाने शहरात ३३ कारवाया करून प्रत्येकी प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एक लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.
प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरण तसेच मानव व पशुंच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निर्माण होत असतोलासाठीही कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असतानाच पशूंचा जीवही जात असल्याचे दिसून येत आहे. तरिही मानवाकडून प्लास्टिकचा वापर काही केल्या कमी होत असल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे, बंदी लावण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टिकमध्ये येणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांचा अतिरेकी वापर सर्वात जास्त हानीकारक ठरत आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरिही त्याचे परिपूर्ण अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही.
प्लास्टीक बंदी अंतर्गत नगर परिषदेने २५ जून २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ दरम्यान विशेष मोहीम राबवून प्लास्टीक विक्रे ते दुकानदारांवर कारवाई केली. नगर परिषदेच्या या मोहिमेंतर्गत पथकाने शहरातील २१६ दुकानदारांवर धाड घालून त्यांच्याकडील प्लास्टिक जप्त केले आहे.
याशिवाय ३३ कारवायांतून प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे एक लाख ६५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशाप्रकारे नगर परिषदेने या मोहिमेतून २.४२५ टन प्लास्टीक साहित्य जप्त केले आहे. यातमध्ये प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल शिट, थर्माकोल प्लेट्स व अन्य भांडे याशिवाय बंदी असलेल्या साहित्यांचा समावेश आहे.
ट्रान्सपोर्ट कंपनीतून १.५० टन माल जप्त
नगर परिषदेने शहरात कित्येक दुकानांतील प्लास्टिक साहित्य जप्त करून त्यांना दंड ठोठावला आहे. मात्र सर्कस मैदान जवळील गोंदिया फ्रेट कंपनी या ट्रान्पोर्ट कंपनीतून पथकाने धाड घालून १.५० टन प्लास्टिक साहित्य जप्त केले होते. तसेच ही त्यांच्यावरील पहिली कारवाई असल्यामुळे त्यांना पाच हजार रूपयांचा दंडही ठोठावला होता.
पुन्हा सुरू झाली जनजागृती मोहीम
राज्यात आलेल्या नव्या शासनातील पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे यांनी प्लास्टीक वापराचा हा विषय गांभीर्याने घेतला असून सिंगल यूज प्लास्टिक मुक्त राज्य बनविण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यांतर्गत सर्व नगर पालिका, महानगरपालिका, नगर पंचायतींना नव्याने प्लास्टिक बंदीसाठी मोहीम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, नगर परिषदेने पुन्हा मोहीम छेडली असून प्लास्टिक वापरू नये याबाबत व्यापाऱ्यांना भेटून जनजागृती केली जात आहे.