खेळाडूंनो, उत्कृष्ट प्रदर्शन करून चांगले भविष्य घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 09:24 PM2017-11-05T21:24:44+5:302017-11-05T21:24:55+5:30

राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन गोंदियात होणे ही गौरवाची बाब आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम येथे झाल्यानेच हे शक्य होवू शकले.

Players, make a good future by performing well | खेळाडूंनो, उत्कृष्ट प्रदर्शन करून चांगले भविष्य घडवा

खेळाडूंनो, उत्कृष्ट प्रदर्शन करून चांगले भविष्य घडवा

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : राज्यातील ३५० खेळाडू वुशू र्स्धेत सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन गोंदियात होणे ही गौरवाची बाब आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम येथे झाल्यानेच हे शक्य होवू शकले. वुशूसारख्या खेळाच्या माध्यमातून केवळ आत्मरक्षाच होत नाही तर बालिकांना स्वत:च्या सुरक्षेसाठी वुशू खेळ महत्वपूर्ण आहे. त्यामुळे खेळाडूंनो, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन करून चांगले भविष्य घडवा, असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे)अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आॅल गोंदिया वुशू संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय वुशू स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
आमदार अग्रवाल पुढे म्हणाले, या स्पर्धेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यातून खेळाळू गोंदियात आले आहेत. परिश्रम व जिद्दीने यशस्वी होवून राष्टÑीयस्तराच्या स्पर्धेत राज्याचे नाव गौरवान्वित करा. आज अभ्यासासह क्रीडा क्षेत्रातही लक्ष देणे गरजेचे आहे. खेळाडूंनी एकमेकांप्रति चांगला भाव ठेवूनच स्पर्धा करावी. विजय-पराजयाला गांभीर्याने घेवू नये. पुढील स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करावे. महाराष्टÑ संपूर्ण देशात क्रीडा निती तयार करणारा पहिला राज्य आहे. भविष्यात गोंदिया जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रात नावलौकीक करणारे खेळाडू तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर स्पर्धेत राज्यभरातून १७६ मुले व १७६ मुली सहभागी झाले होते. पुरस्कार वितरण आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करून विजयी खेळाडू, रेफरी व स्पर्धेशी निगडीत सर्व संबंधितांना मेडल-ट्रॉफी देवूर सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, क्रीडा संयोजक एस.एम. वहाब, विनायक अंजनकर, प्रकाश जसानी, अजय गौर, क्रीडा प्रेमी व खेळाडूंचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गांगरेड्डीवार यांनी मांडले. संचालन करून आभार क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी मानले.

Web Title: Players, make a good future by performing well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.