पाटीलटोला ते नवेगाव रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:47+5:302021-06-16T04:38:47+5:30
पाटीलटोला या गावी रेल्वेची झांझरिया कंपनी असून तेथे कामासाठी बरेच मजूर या रस्त्याने जातात. पाटीलटोला ते नवेगाव हा रस्ता ...
पाटीलटोला या गावी रेल्वेची झांझरिया कंपनी असून तेथे कामासाठी बरेच मजूर या रस्त्याने जातात. पाटीलटोला ते नवेगाव हा रस्ता समोर महामार्गाला जोडला आहे. त्यामुळे येथून गोंदिया ते नागपूरकडे बस धावते. पण पावसाळा सुरू होताच या रस्त्यावरील खडड्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचते. यामुळे खडड्यांचा अंदाज येत नसून अपघातांची शक्यता बळावली आहे. नवेगाव येथे रस्त्याला लागूनच संतोषीमाता मंदिर आहे. त्यामुळे अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी याच मार्गाने जातात. या रस्त्याने नेहमीच ट्रक व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. तसेच घोगरा व पाटीलटोला येथील युवक तिरोडा येथील अदानी कंपनीत कामावर जातात. आता या रस्त्याने पायी तसेच दुचाकी वाहनाने जाणेही धोक्याचे बनले आहे. तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी चौकशी करून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.