तिरोडा-साकोली रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:03 PM2019-08-28T22:03:51+5:302019-08-28T22:04:24+5:30

वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता उखडलेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

The plight of the Tiroda-Sakoli road | तिरोडा-साकोली रस्त्याची दुर्दशा

तिरोडा-साकोली रस्त्याची दुर्दशा

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास : लोकप्रतिनिधींची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
गुलाबटोला : तिरोडा-साकोली हा मार्ग महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा आहे. रस्त्यांचे काम बांपेवाडापासून उमरझरीपर्यंत सुरु आहे. वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता उखडलेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
साकोली येथे ग्रंथालयशास्त्र महाविद्यालय, शासकीय पॉलीटेक्नीक कॉलेज, इंजिनियर कॉलेज, सायन्स कॉलेज या प्रकारचे शैक्षणिक संस्थान असल्याने तिरोडा परिसरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दररोज प्रवास करतात.
तिरोडा-साकोली मार्गाची दुर्दशा झाली असल्याने विद्यार्थ्याना कॉलेजच्या वेळेवर पोहचता येत नाही. तिरोडा परिसरात रस्ते दुरुस्तीचा अनुशेष वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणारे बहुतांश रस्ते खड्यात गेले आहेत.खड्डेमय रस्त्याच्या त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.या रस्त्याने अनेक वाहन चालकांचा बळी घेतला आहे. मात्र अद्यापही याची दखल घेण्यात आली नाही. रस्ते दुरुस्ती कार्यावरुन ग्रामपंचायतच्या ग्रामसभा गाजत आहेत.गावकरी लोकप्रतिनिधींना जाब विचारत आहेत.परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही.निधी मंजुरीचे नेमके काम कुठे अडले आहे हे सामान्य जनतेला कळायला मार्ग नाही.
साकोली तिरोडा रस्ता त्रासदायक झाला आहे. प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन रस्ता दुरुस्ती करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The plight of the Tiroda-Sakoli road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.