बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट

By Admin | Published: May 17, 2017 12:18 AM2017-05-17T00:18:31+5:302017-05-17T00:18:31+5:30

तिरोडा तालुक्यातील मोठी बाजार पेठ असून या बाजार पेठेत माफीया राज सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समिती

Plunder of the farmers in the Market Committee | बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट

बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट

googlenewsNext

मोजणीसाठी शेतकऱ्यांनाच खर्च : पिण्याच्या पाण्याजवळ दुर्गंध
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील मोठी बाजार पेठ असून या बाजार पेठेत माफीया राज सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण भ्रष्टाचाराच्या कचाट्यात सापडलेली आहे. त्यामुळेच संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त झाले. पण आजही भ्रष्टाचारात लपलेले शेतकरी विरोधी प्रशासक म्हणून राज्य करीत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत धान विक्रीसाठी गेले असता संपूर्ण फेरफटका मारुन शेतकऱ्यांशी हितगुज व्यापाऱ्यांशी बसून कर्मचारी वर्गाशी गप्पा गोष्टी करुन संपूर्ण माहिती घेतली असता या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या हिताचा एकही संचालक मंडळाने व मुख्य प्रशासकाने निर्णय घेतला नसल्याचे चित्र दिसले. यात शेतकऱ्यांची लूट होतच असल्याचे दिसले. शासनाने दलाली, मोजाई, पोती भराई शेतकऱ्यांकडून घेणे बंद केले. पण आजही तीन रुपये धानाचे प्रती बोरे भराई घेणे शेतकऱ्यांकडून सुरू आहे. याकडे सहकार निबंधक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक चिंतामन रहांगडाले यांचे दुर्लक्ष असून स्वत: दलाल असून भावाच्या नावाने कारभार करतात. त्यांनीच प्रती तीन रुपये भराई व दलाली सुरू ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे काही व्यापारी, हमाल, शेतकरी वर्गाने सांगितले.
पिण्याच्या पाण्याजवळ नाली असून त्याठिकाणी पाण्याचे माठ ठेवले आहेत. त्या जवळील नालीची सफाई कित्येक वर्षापासून झाली नाही हे त्यांनाच ठाऊक. शेतकऱ्यांना तेथेच जाऊन पाणी प्यावे लागते. पण याकडे प्रशासक मंडळाचे संपूर्ण दुर्लक्ष पण आहे. या बाजारपेठेत नाली तिथेच धानाची बोली बोलली जाते व शेतकरी बसतात. याकडे सहकार निबंधक, जिल्हाधिकारी लक्ष देतील काय अशा प्रश्न शेतकरी करीत आहेत.

 

Web Title: Plunder of the farmers in the Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.