तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट
By Admin | Published: April 16, 2016 01:17 AM2016-04-16T01:17:20+5:302016-04-16T01:17:20+5:30
तिरोडा तालुक्यातील सर्वात नावाजलेली शेतकऱ्यांची धान्य विक्रीची कोठार कृषी उत्पन्न बाजार समितीत
सुविधांचा अभाव : विश्रामगृह नाममात्र, चौकशी खिडकी नाही
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सर्वात नावाजलेली शेतकऱ्यांची धान्य विक्रीची कोठार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असून याकडे प्रशासन व विभागाचे दुर्लक्ष जाणीवपूर्वक आहे.
शेतकरी धान्य बाजार समितीत विक्रीसाठी येत असून आडतिया सकाळी माल विक्री करतो, व्यापारी धान खरेदी करतो व मालाची उचल व्यापारी करतो पण शेतकऱ्यांकडून उचल, मोलाईचे पैसे आडतीया मार्फत वसुल केले जातात. शेतक ऱ्यांचे माल विकावे व तोलाईचे ही पैसे द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांकडून दररोजचा लाखो रुपयांचा सेस जमा केला जातो, तो जातो कुठे असा प्रश्न शेतकरीवर्ग करीत आहे. शासनाचे अनुदान वेगळेच, बाजार समितीच्या हद्दीत असलेले दुकान गाळे यांचे भांडे अनामत रकमेचा अतापताच नाही. एका माजी संचालकाला विचारले असता त्यांनी, सगळ्यांना एक-एक गाळे देण्यात आले होते. कुणी विक्री केली काहीने भाड्याने दिले. सेसच्या पैशांचा हिसोब तर वेगळा सगळे चोर वाटून खाऊ अशी गत असून कोण बोलणार व सामान्य ग्रामीण शेतकऱ्याला काम घेणे देणे एक दिवस जाणे, माल विक्री करुन घरी येणे म्हणून कोणी शेतकरी लक्ष देत नाही असे सांगीतले.
बाजार समिती बरखास्त झाली असून प्रशासक बसले पण तेही आडतीयाच आहेत. ते मौन धारण करुनच असतात. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीत बसण्याची बैठकीसाठी जागा नाही, बरोबर शौचालय नसून सगळीकडे दुर्गंधी, घाण पसरली आहे. दर फलक नाही, अडत, सेस, इतर माहिती फलक, चौकशी खिडकी सुद्धा नाही. व्यापारी, आडतीया, प्रशासकाची साठगाठ असल्याने बाजार समितीत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली संचालक मंडळ बरखास्त झाले. मुख्य कार्यकारी अधीकारी ही निलंबित झाले. सर्व काही काम प्रभारी व प्रशासकाच्या रामभरोसे होत असून आहे. या शेतकऱ्यांच्या व्यथांकडे कोणी लोकप्रतिनिधी लक्ष देईल का व येणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी सहकारी सेवा सदस्य धडा शिकवणार का, अशा प्रश्न सामान्य शेतकरी करीत आहे. (वार्ताहर)