राज्यस्तरीय झाडीबोली पुरस्काराने कवी खोटले सन्मानित ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:58+5:302021-07-15T04:20:58+5:30

झाडीपट्टी साहित्य लेखन कार्य करणाऱ्या निवडक कवी व साहित्यकारांचा दरवर्षी झाडीपट्टी साहित्य मंडळातर्फे गौरव केला जातो. मुरलीधर खोटेले जिल्हा ...

Poet Khotle honored with state level Jadiboli award () | राज्यस्तरीय झाडीबोली पुरस्काराने कवी खोटले सन्मानित ()

राज्यस्तरीय झाडीबोली पुरस्काराने कवी खोटले सन्मानित ()

Next

झाडीपट्टी साहित्य लेखन कार्य करणाऱ्या निवडक कवी व साहित्यकारांचा दरवर्षी झाडीपट्टी साहित्य मंडळातर्फे गौरव केला जातो. मुरलीधर खोटेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडेगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असून, आजपर्यंत अनेक कविता व साहित्य लेखनाच्या माध्यमातून झाडीबोली साहित्य विकसित करण्याचे काम करीत आहेत. आजपर्यंत 'माती मिरली मातीत' हा खंडकाव्य प्रकाशित झाला आहे. या खंडकाव्यास झाडीबोली आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार व झाडीतला गाव कविता संग्रहाला पद्मगंधा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. झाडीबोली अध्यक्ष अरुण झगडकर यांच्या उपस्थितीत, ना. गो. थुटे (झाडीबोली ज्येष्ठ कवी) यांच्याहस्ते मुरलीधर खोटेले यांना सन्मानचिन्ह व मानधन देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक ना. गो. थुटे, लखनसिंग कटरे, ग्रामगीताचार्य बंडोबंत बोडेकर, झाडीबोलीचे दादा कोंडके, खुणे, चंद्रपूर अध्यक्ष विजय वाकुडकर, सुनील पोटे व साहित्यिक उपस्थित होते.

Web Title: Poet Khotle honored with state level Jadiboli award ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.