किटकनाशक फवारणीतून शेतकºयाला विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 09:59 PM2017-10-20T21:59:25+5:302017-10-20T21:59:36+5:30

सालेकसा तालुक्याच्या मोहरानटोली येथील तिलकचंद गणपत बेंदरे (५०) हे शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली.

Poisoning from pesticide sprayer | किटकनाशक फवारणीतून शेतकºयाला विषबाधा

किटकनाशक फवारणीतून शेतकºयाला विषबाधा

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाची बघ्याची भूमिका : तपासणी मोहीम थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या मोहरानटोली येथील तिलकचंद गणपत बेंदरे (५०) हे शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली. ही घटना बुधवारी (दि.१८) रोजी घडली. त्यांना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
किटकनाशक फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली. त्यानंतर या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. यवतमाळ येथील घटनेनंतर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे कृषी केंद्रामधून विक्री केल्या जाणाºया किटकनाशकांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला. विशेष म्हणजे काही कृषी केंद्र संचालकांकडून बंदी असलेल्या किटकनाशकांची विक्री केली जात असल्याची बाब पुढे आली. शिवाय ही किटकनाशके आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेशातून आल्याची ओरड सुरू झाली. किटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर गाढ झोपेत असलेल्या कृषी विभागाला जाग आली. कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवून कृषी केंद्रामधील किटकनाशकांची पाहणी केली. मात्र गोंदिया कृषी विभागाने यानंतर कुठलीही शोध मोहीम राबविली नाही. त्यामुळे येथील कृषी विभागाला अद्यापही जाग आली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान सालेकसा तालुक्यातील मोहारानटोली येथील तिलकचंद बेंदरे या शेतकºयाला किटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाची झोप उडाल्याचे चित्र आहे. दरम्यान आता कृषी विभाग नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Poisoning from pesticide sprayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.