सरकारच्या जनहित विरोधी धोरणांची पोलखोल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:49 PM2019-01-03T21:49:22+5:302019-01-03T21:51:08+5:30
केंद्र व राज्यातील सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होतीे. मात्र सत्तेवर येताच सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी निणर्यांमुळे जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र व राज्यातील सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होतीे. मात्र सत्तेवर येताच सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी निणर्यांमुळे जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यमान सरकारच्या जनहित विरोधी धोरणांची जनतेसमोर पोलखोल करण्याचे आवाहन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.
तालुका राष्टÑवादी काँग्रेसतर्फे बनाथर पंचायत समिती क्षेत्रातील बुथ कमिटी प्रमुख व सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी रॉका जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, युवक तालुकाध्यक्ष जितेश टेंभरे, जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस विद्यार्थी सेलचे अध्यक्ष केतन तुरकर, जि.प.सदस्या रजनी गौतम, प्रेमलाल टेंभरे, माधोसिंह परिहार, छेदीलाल पाचे, परमेश पाचे, अशोक बर्वे, धनंजय गुप्ता, प्रेमलाल दिवेवार, रेवतसिंह बाट, सी.एच.पटले, एम.आर.गजभिये, इंद्रराज सोनवाने, राजकुमार पंडेले, हरितसिंह जतपेले, अशोक माने, बादल भालाधरे, रंजित बिसेन, भय्यालाल कालसर्पे, सेवकराम परिहार, देवेंद्र बागडे, तेजलाल पटले, दुर्गाप्रसाद बिसेन, अशोक बागडे, निरंजन बोम्बर्डे, जितेंद्र नागदेवे, मनोहर दिवेवार, राजेंद्र बिनाखे, राजेंद्र बारापात्रे, बी.आर.नागदिवे उपस्थित होते. जैन म्हणाले राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या मार्गी लावव्या. तसेच पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. या वेळी बुथ प्रमुख व सदस्यांकडून आढावा घेवून मार्गदर्शन केले.
बैठकीला कोचेवाही, बडेगाव, बनाथर, धामनगाव, चंगेरा, सतोना व कोरणी येथील सदस्य उपस्थित होते.