दारू रिचवून गाडी चालवली, पोलिसांनी चांगलीच उतरवली !

By नरेश रहिले | Published: January 1, 2024 07:26 PM2024-01-01T19:26:51+5:302024-01-01T19:27:06+5:30

थर्टीफर्स्टला कारवाई : १४ चालकांवर गुन्हा दाखल.

police action against vehicles | दारू रिचवून गाडी चालवली, पोलिसांनी चांगलीच उतरवली !

दारू रिचवून गाडी चालवली, पोलिसांनी चांगलीच उतरवली !

गोंदिया : मावळत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना धोकादायक स्थितीत वाहन चालविणाऱ्या सात चालकांवर ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.


दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लोधीटोला येथील बसस्थानकावर आरोपी दुर्गेश पुरनलाल नेवारे (३३) रा. ठाणा याला टिप्पर धोकादायक स्थितीत चालविताना पोलिस हवालदार धर्मपाल भुरे यांंनी पकडले. गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुलचूरनाका येथे आरोपी संतोष मोतीलाल चुटे (५४) रा. राजगोपालघाट बजरंग नगर गोंदिया हा मद्याच्या धुंदीत मोटरसायकल चालविताना आढळल्याने पोलिस हवालदार धनराज बागडे यांनी त्याला पकडले.

शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जयस्तंभ चौकात विकास केवलचंद शरणागत (१९) रा. तुमखेडा हा धोकादायक स्थितीत मोटरसायकल चालवित असताना आढळला. पोलिस शिपाई राजेश बिसेन यांनी त्याला पकडले. गोरेगाव बसस्थानकावर पिकअप एमएच ०२ ईसी ००७५ या वाहनाला आरोपी राजेश गोपीचंद सोनटक्के (४५) रा. कमरगाव हा धोकादायक स्थितीत वाहन चालवित होता. सालेकसाच्या बसस्थानकावर आरोपी नंदकिशोर जयलाल नागपुरे (२८) रा. रोंढा, राजेश गेंदलाल चौधरी (२४) रा. गरूटोला मोटारसायकल हलगर्जीपणे चालविताना आढळले. नवेगावबांध पोलिसांनी शिवाजी चौक टी पाॅईंट येथे मुकेश सुरेश ठवरे (२६) रा. भिवखिडकी यांना पाेलिसांनी पकडले. मार्कंड मोरेश्वर हटवार (५१) रा. मुंगली, अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी संविधान चौकात मालवाहक विशाल हेमराज सोनवाने (२५) रा. तिडका यांनाही पोलिसांनी पकडले. त्या सर्व आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
देवरी पोलिसांनी तीन ऑटो चालकांसह पाच जणांची जिरवली
चिचगड टी पाॅईंट येथे छरमदास रामाजी अंबाडारे (४८) रा. धोबीसराड, दशरथ ललवा पांडे (४८) रा. बाह्मणी, अजय नामदेव मेंढे (२१) रा. सिंधीबिरी ता. देवरी, परसोडी येथील अजय बिरबल मरकाम (२९), शिल्पेश शरद शहारे (३४) रा. सौंदड आदी हलगर्जीपणे चालविताना आढळल्याने देवरी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: police action against vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.