रक्तदानासाठी पोलीसही धावून आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:11+5:302021-07-13T04:07:11+5:30
आमगाव : पोलीस ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे आपले ब्रीद सार्थ ठरवित स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्ध नागरिकांच्या संरक्षणासाठी ...
आमगाव : पोलीस ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे आपले ब्रीद सार्थ ठरवित स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्ध नागरिकांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले. कधी दोन फटके मारून, तर कधी मायेने दोन घास भरवित त्यांनी प्रत्येकाला या कठीण प्रसंगात साथ दिली. पण, कोरोनाने त्यांनाच गाठले, तरीही ते कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. आता तेच संवेदनशील पोलीस रुग्णांसाठी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावत ‘लोकमत रक्ताचे नाते’ या उपक्रमात सहभागी झाले असून जीवदानासाठी आपले रक्त देत त्यांनी महादान केले.
‘लोकमत’च्या या उपक्रमात सहभाग घेत पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पवार, जवान अजय बंसोड, सुभाष सहारे, सुरेश लांजेवार, मेजर कोसमे यांनी रक्तदान केले व त्यांचा सेवानिवृत्त प्राचार्य कमलबापू बहेकार, कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय बहेकार, मुरलीधर करंडे, नरेंद्र कावळे, अरुणा गोंडाने, रश्मी पारवे, राजेश जैन, सरपंच हेमराज उईके यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरात ६२ रक्तदात्यांनी रक्तदान करून महादानात भाग घेतला. संचालन राजीव फुंडे यांनी केले. आभार विजय रगडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राहुल उजवने, अपूर्वा बहेकार, सचिन ढोक, आशिष बोहरे, राजेश बंसोड, देव बंसोड, प्रफुल सोमवंशी, सौरभ ब्राह्मणकर, शुभम जांभुळकर, नरेश बनकर,पराग खंडाळे, देवराज बहेकार, जयश्री फुंडकर, वर्षा शर्मा, मीना चौहान, रितेश चुटे, आसिक बोरकर,धनिराम चक्रवर्ती, भूपेंद्र सूर्यवंशी, संतोष ठाकरे, महेश माटे, दीनदयाल थेर, कार्तिक मेंढे, प्रकाश फुंडे, संगम बोरकर, नरेश लांजेवार, सुभाष सहारे, विजय कोसरे, प्रेमलाल टेंभरे, आशिष वैद्य, रुपेश थेर, रामेश्वर महारवाडे, जीवनलाल कावळे, पतीराम भांडारकर, संदीप मेश्राम, आशीष रामटेके, दीपक गणोरकर, कशिश रामटेके, गोपाल हलमारे, सुरेंद्र लांजेवार, अभिषेक रहांगडाले, अंकित गुमतलवार, लेखराम कटरे, रितेश नागपुरे, विकेंद्र पांडे, संतोष येटरे, राजेंद्र शेंडे आदींनी सहकार्य केले.