दोन अट्टल घरफोड्यांच्या पोलिसांनी बांधल्या मुसक्या

By नरेश रहिले | Published: June 1, 2024 04:08 PM2024-06-01T16:08:54+5:302024-06-01T16:09:21+5:30

शहर पोलिसांची कारवाई: चोरीला गेला २.२० लाखाचा तर हस्तगत १.८२ लाखाचा माल जप्त

Police arrested two persistent burglars | दोन अट्टल घरफोड्यांच्या पोलिसांनी बांधल्या मुसक्या

Police arrested two persistent burglars

गोंदिया: शहराच्या आशीर्वाद धर्म काट्याच्या मागे, कुंदन कुटी मंदीर जवळ, मुर्री येथील देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल यांच्या घरून २५ ते २६ मे च्या रात्री दरम्यान २ लाख २० हजार ५०० रूपयाचे दागिणे चोरून नेणाऱ्या दोन अटञटल चोरट्यांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या जवळून १ लाख ८२ हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल हे कुटुंबासह बाहेरगावी शिवणी (मध्यप्रदेश) येथे गेले होते.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे व ९० हजार रुपये रोख असा किंमती एकूण २ लाख २० हजार ५०० रुपयांचा माल चोरुन नेला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४५४, ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या नेतृत्वातील गुन्हे प्रकटीकण पथकातील अधिकारी-अंमलदार यांनी या गुन्हयातील आरोपी फरहान ईशाक कुरैशी (२०) व आशिक नरेंद्र बन्सोड (२०) दोन्ही रा. बाजपेयी वार्ड, गौतमनगर, गोंदिया यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर, गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांढरे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटीया, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, रिना चव्हान, अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने यांनी केली आहे.

४ जून पर्यंत पोलीस कोठडी
आरोपी फरहान ईशाक कुरैशी (२०) व आशिक नरेंद्र बन्सोड (२०) दोन्ही रा. बाजपेयी वार्ड, गौतमनगर, गोंदिया यांच्या घरी घरझडती घेऊन १ लाख ८२ हजारचा माल जप्त केला आहे. त्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपींना ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम करीत आहेत.

Web Title: Police arrested two persistent burglars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.