पोलीस पथकावर हल्ला

By Admin | Published: June 24, 2017 01:53 AM2017-06-24T01:53:18+5:302017-06-24T01:53:18+5:30

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या सात आरोपींना प्रतिबंध घालण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच त्यांनी हल्ला केला.

Police attack | पोलीस पथकावर हल्ला

पोलीस पथकावर हल्ला

googlenewsNext

दोन पोलीस जखमी : दोन तलावारींसह विविध साहित्य जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या सात आरोपींना प्रतिबंध घालण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच त्यांनी हल्ला केला. यात दोन पोलीस जखमी झाले. ही घटना गुरूवार (दि.२२) रात्री ८.४५ वाजता स्मशानभूमी रस्ता, आसाराम बापू आश्रम रोड गोंदिया येथे घडली.
या प्रकरणातील सातही आरोपींना त्याच दिवसी रात्री ११.३० वाजता अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये मंगल सुरेंद्र नेताम (३४) रा. गौशाला वार्ड, मुकेश कुमार राजकुमार (२६), खन्ना राजकुमार कुमार (२३) व गुलशन उर्फ महेंद्रसिंग चिंडाले (२२) तिन्ही रा. दसखोली गोंदिया, योगेश गोविंदराव उगेमुगे (२७) रा. स्मशान रोड गोंदिया, अनिल उर्फ कँडील जयेंद्र बन्सोड (२३) रा. स्मशान रोड गोंदिया व सुनील वामन माहुरे (३५) रा. श्रीनगर गोंदिया यांचा समावेश आहे.
सदर आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी दोन तलवार, एक लोखंडी रॉड, मिरची पुड, नायलॉनची दोरी, दोन काठ्या, दोन देशी दारूचे पव्वे जप्त केले.
पोलीस हवालदार कृपाण यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३९९, ४०२, ३५३, ३३२, ३२३ भारतीय हत्यार कायद्याच्या सहकलम ६५ ख खंड ड मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बोरकर करीत आहेत.

Web Title: Police attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.