पोलीस वसाहतीच्या स्वच्छतेचा युवकांनी उचलला विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:33 AM2018-12-16T00:33:28+5:302018-12-16T00:36:03+5:30

‘मरावे परी किर्तीरुप उरावे’ अशी मराठी म्हण आहे. ज्या समाजात जगलो, मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडायला पाहिजे. या भावनेतून गोरेगाव येथील जय महाकाल ग्रुपच्या ४० युवकांनी पोलीस वसाहतीत स्वच्छता अभियान राबवून, झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Police colonies lifted the youth cleanliness | पोलीस वसाहतीच्या स्वच्छतेचा युवकांनी उचलला विडा

पोलीस वसाहतीच्या स्वच्छतेचा युवकांनी उचलला विडा

Next
ठळक मुद्देजय महाकाल ग्रुपचा पुढाकार : ४० युवकांचे श्रमदान

दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : ‘मरावे परी किर्तीरुप उरावे’ अशी मराठी म्हण आहे. ज्या समाजात जगलो, मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडायला पाहिजे. या भावनेतून गोरेगाव येथील जय महाकाल ग्रुपच्या ४० युवकांनी पोलीस वसाहतीत स्वच्छता अभियान राबवून, झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. स्वत: श्रमदान करुन समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि.१५) सकाळी ७ वाजता युवकांनी स्वच्छता अभियान राबवून पोलीस वसाहतीचा कायापालट करण्याचा विडा उचलला.
‘लोकमत’ने ‘पोलीस वसाहतीला अखेरची घरघर’ या मथळ्याखाली १३ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिडक्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही हे जळजळीत वास्तव समोर आणले. याची स्थानिक जयमहाकाल ग्रुपने याची दखल घेतली. ४० युवकांना हाताशी घेत या ग्रुपने श्रमदानातून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. प्रशासनाने स्वच्छतेविषयी जागृती केली असली तरी पोलीस वसाहतीतील अस्वच्छतेमुळे येथील कुटुंबियांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे होते. समाजातील एक महत्वाचा घटक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. २४ तास गस्त बंदोबस्त यात व्यस्त असणारे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे ही समाजाची सुध्दा जबाबदारी आहे. मात्र संवेदना बोथट झालेल्या प्रशासनाला पोलिसांच्या समस्येविषयी काहीही घेणे देणे नाही. फक्त पोलिसांनी लोकांच्या समस्या सोडवाव्या, या अलिखित फतव्यामुळे प्रशासनही त्यांच्याकडे कानाडोळा करीत असेल तर यापेक्षा मोठे दुदैव काय. लोकमतने पोलीस वसाहतीच्या समस्यांविषयी बातमी प्रकाशित केल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी लोकमतने कौतुक केले. पण पोलीस वसाहतीतील समस्यांना सोडविण्यासाठी कुणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही. मात्र जय महाकाल या व्हॉटस्प ग्रुपने, ग्रुपवर सर्व सदस्यांशी चर्चा करुन पोलीस वसाहतीच्या आवारात स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला. युवकांनी श्रमदान करुन परिसर स्वच्छ केला. श्रमदानाला माजी उपसरपंच राहुल कटरे, नरेश अगडे, पवन रहांगडाले, सोनू पटले, महेंद्र गौतम, संतोष पटले, मुन्ना बिसेन, गुड्डू कटरे, नंदलाल सोनवाने, अमोल लांजेवार, सुधीर कटरे, पंचभाई, रवि कुंभरे, रविंद्र रहांगडाले, सचिन ठाकरे, मंगेश शेंडे, सौरभ पारधी, रामेश्वर कापसे, सतिश बावणकर, गोपाल हत्तीमारे, आनंद चर्जे, राजेंद्र बगळते, विजय बिसेन, रामू येल्ले उपस्थित होते.

पोलिसांनी मानले लोकमतचे आभार
पोलीस वसाहतीतील विविध समस्या लोकमतने चव्हाट्यावर आणल्यावर व दोन दिवसातच येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याने येथील पोलीस कुटुंबियांनी लोकमतचे आभार मानले.

लोकमतमध्ये पोलीस वसाहतीला अखेरची घरघर बातमी वाचली. त्यानंतर दोन दिवस वाट पाहली. स्थानिक प्रशासन काहीतरी उपाय योजना करेल असे वाटले मात्र त्यांनी कुठलेच पाऊल न उचलल्याने जय महाकाल ग्रुपच्या माध्यमातून वसाहत परिसरात श्रमदान करण्याचा संकल्प केला.
- राहुल कटरे, अध्यक्ष जय महाकाल ग्रुप.
प्रथम समस्येची बातमी प्रकाशित करायची व त्या बातमीचा पाठपुरावा करायचा हे लोकमत वृत्तपत्राचे काम प्रशंसनिय आहे. मी मनापाूसन लोकमतचे आभार मानतो.
- एस.डी.दसूरकर, पोलीस निरीक्षक, गोरेगाव.

Web Title: Police colonies lifted the youth cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस