अन्यायग्रस्त महिलांकडे पोलीस करतात दुर्लक्ष

By admin | Published: February 12, 2017 12:48 AM2017-02-12T00:48:45+5:302017-02-12T00:48:45+5:30

माझ्याविरूध्द खोट्या तक्रारी पोलिसात देऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मला झालेल्या त्रासाची तक्रार

The police do not ignore the unjust women | अन्यायग्रस्त महिलांकडे पोलीस करतात दुर्लक्ष

अन्यायग्रस्त महिलांकडे पोलीस करतात दुर्लक्ष

Next

पोलिसांचा प्रताप : पवार यांच्या काळापासून त्रास
गोंदिया : माझ्याविरूध्द खोट्या तक्रारी पोलिसात देऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मला झालेल्या त्रासाची तक्रार देण्यास मी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिस माझ्या तक्रारीवर कारवाई करीत नाही. अन्यायग्रस्त लोकांकडे रामनगर पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यास्मीन सोलंकी यांनी केला आहे.
यास्मीन सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार गड्डाटोली येथील २७ गैरअर्जदारांनी मला त्रास देण्याचा प्रकार सुरू केला आहे. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. मला अपशब्दात बोलणे, विनाकारण भांडण करून शिविगाळ करणे, ठार करण्याची धमकी देणे हा प्रकार नित्याचाच झाला आहे.
यासंदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात दोनवेळा तक्रारी केल्या परंतु पोलिसांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तत्कालीन ठाणेदार बाळासोहब पवार यांनीही माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. आता त्यांचे काम ठाणेदार संजय देशमुख करीत आहेत. गैरअर्जदारांनी बचत गटाचे माझे ४४३० रूपये हडपले आहेत. इतकेच नव्हे तर मला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न गैरअर्जदारांनी केला होता. बचत गटातील पाच महिलांचे बीपीएल बोगस आहेत.
यासंदर्भात सर्व पुरावे मी तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून दिल्यामुळे गैरअर्जदार माझा राग करीत आहेत. रामनगर पोलिसांनी माझ्या तक्रारीची फाईल बंद केली आहे. ती फाईल उघडून मला न्याय देण्यात यावे, अशी मागणी यास्मीन सोलंकी यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The police do not ignore the unjust women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.