ट्रिपल वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:11+5:302021-09-05T04:33:11+5:30
कपिल केकत गोंदिया : कोणतेही वाहन चालविताना स्वत:च्या व समोरच्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. ...
कपिल केकत
गोंदिया : कोणतेही वाहन चालविताना स्वत:च्या व समोरच्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र त्या नियमांना बगल देत वाहन चालविले जात असल्याने अपघात घडतात व कित्येकदा जीवावर बेततात. यामध्ये दुचाकी वाहन चालविणाऱ्यांसाठी ट्रिपलसीट वाहन न चालविण्याबाबत नियम करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही कित्येक जण फक्त फुशारकी म्हणून ट्रिपलसीट वाहन चालवितात. हा प्रकार त्यांच्या जीवावरही बेततो. मात्र यानंतरही हे प्रकार थांबत नसून वाहतूक नियंत्रण शाखेच्या अशा ट्रिपलसीट वाहनांवरच सर्वाधिक कारवाया होताना दिसतात. विशेष म्हणजे, या वर्षातील ७ महिन्यात वाहतूक नियंत्रण शाखेने तब्बल १४४४९ कारवाया केल्या असून त्यातून ३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
--------------------------
किती जणांवर झाली कारवाई?
जानेवारी - २३९०
फेब्रुवारी - १६३८
मार्च - १९०३
एप्रिल - १७५६
मे - २६४८
जून - २३४०
जुलै -१७७४
ऑगस्ट - ००
--------------------------
२) दोन कॉलम फोटो (ट्रीपल सीट वाहन चालकाचा लाईव्ह फोटो)
-----------------------------
दुचाकी वाहन चालकांनो हे नियम पाळा
- वाहन चालविताना नेहमी परवाना व वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवा.
- हेल्मेट लावूनच दुचाकी वाहन चालवा.
- ट्रीपलसीट कधीही वाहन चालवू नये.
- ठरवून दिलेल्या गती पेक्षा जास्त गतीने वाहन चालवू नये.
- दुचाकीचे हेड व टेललाईट सुरू होतात याकडे लक्ष द्या.
- वाहतूक पोलिसांना नेहमी सहकार्य करा.
--------------------------------
...तर पाचशेचा दंड
विना हेल्मेट - ५०० रुपये
प्रेशर हॉर्न - १००० रुपये
विना परवाना - १००० रुपये
स्टंटबाजी - १००० रुपये
ओव्हर - १००० रुपये