पोलिसांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:53 PM2017-12-31T23:53:40+5:302017-12-31T23:54:03+5:30

नक्षलग्रस्त भागातील अधिकारी-कर्मचारी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. चांगले काम करणाºया अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगवर्धीत पदोन्नती योजना आहे.

Police must adapt the technology | पोलिसांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे

पोलिसांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे

googlenewsNext
ठळक मुद्देअंकुश शिंदे : ‘आपले सरकार’ सुविधा केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षलग्रस्त भागातील अधिकारी-कर्मचारी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. चांगले काम करणाºया अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगवर्धीत पदोन्नती योजना आहे. जनतेसाठी काम करीत असताना पोलीस विभाग लोकाभिमुख करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी केले.
शनिवारी (दि.३०) पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘आपले सरकार’ नागरी सुविधा केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, नागरी संरक्षण दलाचे महासमादेशक अरविंद देशमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना शिंदे यांनी, गोंदियासारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा वापर करु न चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारची सेवा देणारा गोंदिया हा पहिलाच जिल्हा आहे. पोलीस विषयक कायद्याचा वापर चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. भविष्यात तंत्रज्ञान हे सर्वव्यापी होणार असल्यामुळे पोलीस विभागातील प्रत्येकाने त्याचा प्रभावी वापर करण्यास तयार व्हावे. त्यामुळे विकासाला गती मिळेल असे सांगितले.
जिल्हाधिकारी काळे यांनी, आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात आज होत आहे. गोंदिया पोलीस दलाने जिल्ह्यासाठी एखादे स्वतंत्र अ‍ॅप तयार करावे. पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. भूजबळ चांगले काम करीत असल्याचे ते म्हणाले.
ठाकरे यांनी, अशा कार्यक्र मांच्या माध्यमातून पोलीस विभाग लोकाभिमुख होण्यास मदत होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचाºयांमध्ये क्षमता विकसीत होत आहे.जिल्ह्यातील पोलीस दलात चांगले वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
देशमुख यांनी, जिल्ह्यातील प्रशासनात अत्यंत चांगला समन्वय आहे.जिल्ह्यात रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतूकीचे नियम प्रत्येकाने पाळले पाहिजे. त्याबाबत जागरु कही असले पाहिजे. जिल्ह्यात नागरी संरक्षण क्षेत्रात चांगले काम करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भूजबळ यांनी, या सुविधेमुळे नागरिकांना सेवा देणे सोईचे होणार आहे. नागरिकांच्या तक्र ारी यापुढे आॅनलाईन तसेच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहे. तक्र ारीची त्यांना पोच मिळून प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे? याबाबत सुद्धा माहिती मिळणार आहे. किओक्स केंद्राच्या माध्यमातून पोलीसविषयक सेवा गतीमान करण्यात येईल असे सांगितले.
विशेष म्हणजे, याप्रसंगी पोलीस मुख्यालयाचे राखीव फौजदार सुनील बांबडेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

Web Title: Police must adapt the technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस