दीड हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:36 PM2019-03-13T21:36:12+5:302019-03-13T21:36:37+5:30

दारु विक्रेत्याकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) तालुक्यातील गंगाझरी येथे करण्यात आली. देवेंद्र शिवलाल चोपकर नायक पोलीस शिपाई, ब.न. १३५५ असे आरोपीचे नाव असून तो पोलीस स्टेशन गंगाझरी येथे कार्यरत आहे.

Police officials were caught in the twentieth-day bribe | दीड हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला

दीड हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला

Next
ठळक मुद्देदारू विक्रेत्याला पैशाची मागणी : नेहमीच्या हप्त्याला कंटाळून केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दारु विक्रेत्याकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) तालुक्यातील गंगाझरी येथे करण्यात आली. देवेंद्र शिवलाल चोपकर नायक पोलीस शिपाई, ब.न. १३५५ असे आरोपीचे नाव असून तो पोलीस स्टेशन गंगाझरी येथे कार्यरत आहे.
तक्रारदार हे शेतीसह दारु विक्रीचा व्यवसाय करायचे. त्याकरिता ते बिट अंमलदारांना १५०० रुपये मासिक हप्ता देत होते. दरम्यानच्या काळात दारु विक्रीचा व्यवसाय मंदावल्यामुळे ते बिट अंमलदारांना १५०० रुपये ऐवजी १००० रुपये मासिक हप्ता देत होते. जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याविरुद्ध आबकारी विभागाकडून अवैधरित्या दारु विक्रीची कारवाई झाल्यापासून त्यांनी दारु विक्रीचा व्यवसाय बंद केला होता. मात्र यानंतरही बिट अंमलदार देवेंद्र चोपकर यांनी तक्रारदारावर अवैध दारु विक्रीची कारवाई न करण्यासाठी १५०० रुपये मासिक हप्ताची मागणी केली.
तक्रारदाराला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १२ फेब्रुवारीला देवेंद्र चोपकर विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली. १२ फेब्रुवारीला लाच मागणीची पडताळणी करून कारवाई केली.
आरोपी लोकसेवक देवेंद्र शिवलाल चोपकर (३२) याला १५०० मासिक हप्ताची लाच घेतांना रंगेहात पकडले. त्याच्या विरूध्द गंगाझरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस हवालदार प्रदीप तुळसकर, राजेश शेंद्रे, रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, महिला नायक पोलिस शिपाई वंदना बिसेन, गीता खोब्रागडे व चालक देवानंद मारबते यांनी केली आहे.
तरूणाने खाल्ले खाजेचे औषध
गोंदिया : तेलंगाना येथील राकेश धर्मेंद्र संकेशुला (२७) याने खाजेचे औषध सेवन केले. तो काम करण्यासाठी तेलंगाना वरून गोंदियात आला होता. गोंदियाच्या श्रीनगरात तो राहात होता. त्याला १२ मार्चच्या दुपारी १२.२५ वाजता उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दखल करण्यात आले.

Web Title: Police officials were caught in the twentieth-day bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.