पोलीस पाटलांनी गावाचा प्रमुख समजून कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:36 PM2018-01-29T20:36:25+5:302018-01-29T20:36:46+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावच्या सभागृहात पोलीस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली.

The Police Patels should work on the head of the village | पोलीस पाटलांनी गावाचा प्रमुख समजून कार्य करावे

पोलीस पाटलांनी गावाचा प्रमुख समजून कार्य करावे

Next
ठळक मुद्देअभिमन्यू काळे : पोलीस पाटील कार्यशाळा

आॅनलाईन लोकमत
गोरेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगावच्या सभागृहात पोलीस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अतिथी म्हणून तहसीलदार कल्याणकुमार डहाट, पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे, जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, कार्याध्यक्ष आनंदराव तुरकर, श्रीराम झिंगरे, नंदा ठाकरे, अनिता लंजे, गायत्री पवार, विजय घाडगे, यशवंत ईरडंडे, मुरारी दहीकर उपस्थित होते.
कार्यशाळेला ७०० पोलीस पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पोलीस पाटील हा गाव पातळीवरील शासनाचा प्रतिनिधी आहे. त्यांनी गावचा जिल्हाधिकारी समजून कामे करावी, बदलत्या काळात पोलीस पाटलांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.
पोलीस पाटलांनी अनेक कामासाठी सहकार्य केले आहे.आपण संगठीत शक्तीचा वापर विधायक कार्यासाठी करीत आहात. आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी असल्याची ग्वाही देतो असे म्हणाले.
पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भूजबळ म्हणाले, गुन्हेगारावर वचक निर्माण होईल असे कार्य पोलीस पाटलांनी करावे. जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे उर्वरित प्रवास भत्याची रक्कम लवकरच देण्यात येईल. जिल्हा स्तरावर पोलीस पाटील भवनाकरिता जागा उपलब्ध होईपर्यंत प्रेरणा सभागृहाचा वापर कार्यक्रमासाठी करावा असे सांगितले. याप्रसंगी महाराष्टÑ राज्य ग्रामीण कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक भृंगराज परशुरामकर, संचालन राजेश बन्सोड तर आभार दिलीप मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोमेश कटरे, परिमल ठाकूर, प्रेमलाल टेंभरे, गिरधारी रहांगडाले, प्रकाश कठाणे, युवराज साखरे, तोमेश कोहळे, माधोराव शिवणकर, सेवकराम चौरागडे, सोहनलाल मलकाम, रंजीत सहारे, सोमराज बघेले, हेमराज सोनवाने, आनंदराव परतेती यांनी सहकार्य केले.

Web Title: The Police Patels should work on the head of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.