प्रवासभत्यापासून पोलीस पाटील वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:00 AM2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:07+5:30

पोलीस स्टेशन अंतर्गत उपशाखा अध्यक्षाकडून पोलीस स्टेशन निहाय पोलीस पाटलांच्या समस्या व अडचणी अध्यक्षानी जाणून घेतल्या. काही पोलीस स्टेशनकडून पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या प्रवास भत्यापासून वंचित ठेवले आहे. पोलीस पाटील भरती न झाल्याने अनेक पोलीस पाटीलांचे पद्दे रिक्त आहेत. देवरी उपविभागीय कार्यालयातंर्गत आमगाव, देवरी,सालेकसा आणि चिचगढ यातील रिक्त असलेल्या जागांची भरती प्रकिया सुरू झाली आहे.

Police Patil deprived of passenger | प्रवासभत्यापासून पोलीस पाटील वंचित

प्रवासभत्यापासून पोलीस पाटील वंचित

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलन छेडण्याचा निर्धार : पोलीस पाटील संघटनेच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरदोली : गोरेगाव तालुक्यातील चुलबंद रोपवाटीका मुरदोली येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगगराज परशुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक रविवारी पार पडली.
या वेळी उपाध्यक्ष दिलीप मेश्राम, कोषाध्यक्ष रमेश टेंभरे, सचिव रामजी झिंगरे, राजेश बन्सोड, महिला अध्यक्षा नंदा ठाकरे,उपाध्यक्ष अनिता लंजे, सहसचिव बाळकृष्ण शहारे, विलास साखरे उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत उपशाखा अध्यक्षाकडून पोलीस स्टेशन निहाय पोलीस पाटलांच्या समस्या व अडचणी अध्यक्षानी जाणून घेतल्या. काही पोलीस स्टेशनकडून पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या प्रवास भत्यापासून वंचित ठेवले आहे. पोलीस पाटील भरती न झाल्याने अनेक पोलीस पाटीलांचे पद्दे रिक्त आहेत. देवरी उपविभागीय कार्यालयातंर्गत आमगाव, देवरी,सालेकसा आणि चिचगढ यातील रिक्त असलेल्या जागांची भरती प्रकिया सुरू झाली आहे. केशोरी २१ नवेगांवबांध १४, अर्जुनीमोरगाव १२, डुग्गीपार १२ गोरेगाव ९, तिरोडा १२ अशा अनेक ठिकाणी पोलीस पाटीलांचे पदे रिक्त आहेत. एक पोलीस पाटील अनेक गावांचा पदभार सांभाळून शासनास सहयोग करतो. यापैकी काही पोलीस स्टेशन नक्षल प्रभावित असल्याने पोलीस पाटलांना संवेदनशीलता ठेऊन गांवात काम करावे लागते. पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या प्रवासभत्या पासून वंचित का ठेवले जाते असा सवाल भृंगराज परशुरामकर यांनी उपस्थित केला. दिलीप मेश्राम यांनी सागीतले की संघटनेने १ जानेवारी २०१२ ते २०१६ पर्यंतच्या जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा मिटींगचा प्रवास भता मिळवून दिला. पोलीस पाटील व्हिजीट बुक पोलीस स्टेशनला ठेवण्याचे निर्देश दिले.पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे. पोलीस पाटलांचा थकीत प्रवास भत्ता त्वरीत न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या वेळी गजानन जांभूळकर, टिकाराम कापगते, बनमाली मंडल,चंद्रहास भांडारकर, लोकचंद भांडारकर,परिमल ठाकूरउपस्थित होते.

Web Title: Police Patil deprived of passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.