२०० रुपयांची लाच प्रकरणातील पोलीस कर्मचारी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:30 AM2021-04-04T04:30:24+5:302021-04-04T04:30:24+5:30
न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावर ३१ मार्च रोजी सुनावणी करताना न्यायाधीश उदय शुक्ला यांनी या पोलीस कर्मचाऱ्याची निर्दोष ...
न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावर ३१ मार्च रोजी सुनावणी करताना न्यायाधीश उदय शुक्ला यांनी या पोलीस कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता केली.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचारी अनिल ग्यानचंदानी हे कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारकर्त्या पोलीस कर्मचाऱ्याकडून १५ दिवसांची रजा मंजूर करण्यासाठी २०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीवरून आणि तक्रारकर्त्याने दिलेल्या पुराव्या आणि व्हाईस रेकार्डडिंगवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण विशेष न्यायालय (भ्रष्टाचार निवारण अधिनियम) येथे सुरू होते. अनिल ग्यानचंदानी यांचे वकील प्रकाश नायडू यांनी ग्यानचंदानी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप तथ्यहिन असल्याचे सांगत त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अयोग्य असल्याचा दावा केला, तसेच यासाठी पंचाची साक्ष आणि पुरावे सादर केले. न्यायालयाने सर्व पुराव्यांची पडताळणी करून पोलीस कर्मचारी अनिल ग्यानचंदानी यांची निर्दोष मुक्तता केली. ग्यानचंदानी यांच्यावतीने ॲड. खंडेलवाल, ॲड. प्रकाश नायडू, हाेमश चव्हाण, मितेश बैस, सुरभी गोडबोले यांनी बाजू मांडली.