केशोरी येथे पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:30+5:302021-07-02T04:20:30+5:30
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यात येत आहेत. ग्रामीण व आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भागातील तरुणी आणि तरुणांना पोलीस ...
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यात येत आहेत. ग्रामीण व आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भागातील तरुणी आणि तरुणांना पोलीस सेवेची संधी प्राप्त होण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या सूचनेनुसार येथील ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात केशोरी पोलीस स्टेशन सभागृहात पोलीस सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी एकदिवसीय पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे आणि सहायक पोलीस निरीक्षक शेख उपस्थित होते. प्रशिक्षणाचा लाभ परिसरातील २५ ते ३० युवक-युवतींनी घेतला.
या पोलीस स्टेशनअंतर्गत वर्षभर विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. गरीब व हुशार युवकांसाठी अभ्यासाकरिता सुसज्ज वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे, हे विशेष.