शिकारीटोल्यात हातभट्टीवर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 09:24 PM2018-02-25T21:24:39+5:302018-02-25T21:24:39+5:30
सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत तालुका मुख्यालयापासून १२ किमी. अंतरावरील शिकारीटोला गावात पोलिसांनी शनिवारी (दि.२४) दुपारी अचानक दारुभट्टीवर धाड घालून २० लिटर दारु जप्त केली आहे.
ऑनलाईन लोकमत
सालेकसा : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत तालुका मुख्यालयापासून १२ किमी. अंतरावरील शिकारीटोला गावात पोलिसांनी शनिवारी (दि.२४) दुपारी अचानक दारुभट्टीवर धाड घालून २० लिटर दारु जप्त केली आहे. मात्र दारू गाळणारा आरोपी जगन अम्मू टेकाम (४०) हा घटनास्थळावरुन फरार झाला.
शिकारीटोला गाव हे मरकाखांदा परिसरात घनदाट जंगलव्याप्त क्षेत्रालगत असून या परिसरात मोहफुलाचे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. येथे अनेक लोक मोहफुलापासून दारु गाळून विकण्याचा अवैध धंदा करीत आहेत. यात आरोपी जगन टेकाम सुद्धा अवैधरित्या हातभट्टी चालवून मोहफुलाची दारु गाळून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय चालवित होता. सालेकसा पोलिसांना याची भनक लागली असता त्यांनी शनिवारी (दि.२४) अचानक त्यांच्या घरी धाड टाकली.
यात जगन आपल्या घराच्या मागील वाडीत दारु गाळण्याचे काम करीत होता. पोलिसांनी त्या ठिकाणी गेले असता दारु गाळण्याचे साहित्य, मोहफुल आणि १० लिटर प्रमाणे मोहफुलाच्या दारुच्या दोन डबक्या सापडल्या. एकूण २० लिटर दारुची किमत दोन हजार रूपये असून या प्रकरणाची चौकशी करतानाच आरोपी जगन पोलिसांच्या हाती न लागत फरार झाला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देव करीत आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.