उन्हाच्या तीव्रतेने पोलीस भरतीत कसरत

By Admin | Published: April 5, 2016 04:16 AM2016-04-05T04:16:45+5:302016-04-05T04:16:45+5:30

जिल्हा पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्चपासून शारीरिक क्षमता चाचणी घेतली

Police recruitment with intense heat | उन्हाच्या तीव्रतेने पोलीस भरतीत कसरत

उन्हाच्या तीव्रतेने पोलीस भरतीत कसरत

googlenewsNext

गोंदिया : जिल्हा पोलीस विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई पदाच्या ४० जागांसाठी २९ मार्चपासून शारीरिक क्षमता चाचणी घेतली जात आहे. उन्हाचा तडाखा वाढतच असल्यामुळे या चाचण्यांना सामोरे जाताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. दुसरीकडे उन्हाचा फटका बसू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून शक्य ती काळजी घेतली जात आहे.
सध्या गोंदिया जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर चढला आहे. परंतु या उन्हाचे चटके उमेदवारांना फारसे जाणवणार नाही अशी व्यवस्था गोंदिया पोलीस विभागाने केली आहे. पहाटे ५ वाजतापासून तर सकाळी १० वाजतादरम्यान गोंदिया पोलीस विभाग शारीरिक चाचणी घेत आहे. उमेदवारांना थकवा जाणवू नये यासाठी शासनाने सशुल्क तत्वावर पाणी पाऊच, केळ, ग्लुकोजची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. परंतु गोंदिया पोलीस विभागाने यंदा तरूणांसाठी मोफत केळ, ग्लुकोज व पाण्याची सोय केली आहे. सोबतच दोन वैद्यकीय चमू ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी सकाळी १० च्या आत घेऊन उमेदवारांना घरी जाण्याची परवानगी दिली जात आहे. उर्वरित एक इव्हेंट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच ५ वाजता उभे राहण्याचा सल्ला देतात. यामुळे उमेदवारांना उन्हाची दाहकता जाणवत नाही.
२९ मार्चपासून सुरू झालेली शारीरिक चाचणी ९ एप्रिलपर्यंत घेण्यात येणार असून उमेदवारांचा पाचवा इव्हेंट १६०० मीटर धावणे दुसऱ्या दिवशीे १० एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
शारीरिक क्षमता चाचणीचे गुण सोबतच त्याच दिवशी बोर्डवर व गोंदिया पोलीस विभागाच्या वेबसाईटवर टाकले जातात. याच महिन्यात महावीर जयंती, आंबेडकर जयंती व रामनवमी असे सन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त लागणार असल्याने या महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती जाणार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

३२ कॅमेऱ्यांच्या नजरेत भरती
४ पोलीस भरती पारदर्शकता ठेवण्यासाठी १६ सीसीटिव्ही तसेच १६ हॅडलींग व्हीडिओ कॅमेरे ठेवण्यात आले आहे. धावणे, गोळा फेक, लांब उडी, पूल अप्स व शंभर मीटर अशा चाचण्यांच्या ठिकाणी सिसीटीव्ही व हॅडलिंग कॅमेरे ठेवण्यात आले आहेत.
४भरती प्रक्रियेकरिता पोलीस अधीक्षक मिना, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, परि. सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, पोलीस उपअधिक्षक (गृह) सुरेश भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर, दीपाली खन्ना, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी व लिपीकवर्गीय कर्मचारी कार्यरत आहेत.

एका पदामागे १५ उमेदवार
४शारीरिक चाचणी उतीर्ण झालेल्या सर्वच उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाणार नाही. तर एका पदामागे १५ उमेदवार घेण्यात येणार आहे. त्यामुळे ४० पदासाठी ६०० उमेदवारांना बोलावले जाणार असल्याचे अपेक्षित असले तरी एकाच सारखे गुण शेकडो मुलांनी घेतल्यामुळे टक्केवारी नुसार समान आकडा असलेल्या सर्व मुलांना लेखी परीक्षेसाठी त्या सर्वाना बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे ८०० ते ९०० उमेदवारांना बोलावल्या जाण्याची शक्यात आहे.

सर्वांना मोबाईल बंदी
४गोंदिया पोलीस विभागात घेण्यात शिपाई पदाच्या भरतीत पारदर्शता ठेवण्यासाठी या पोलीस भरतीच्या कामात असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुणीही मोबाईल आणणार नाही अशी ताकीद पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी दिल्याचे समजते.

Web Title: Police recruitment with intense heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.