आदर्शचा १२ तासात लावला पोलिसांनी शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:40 PM2019-03-19T21:40:41+5:302019-03-19T21:42:58+5:30

अपहरणाचा संशय असलेल्या आदर्श राजा महानंदे (११) विद्यार्थ्याचा अवघ्या १२ तासात शोध घेण्यात नवेगावबांध पोलिसांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१८) घडली.

The police searched the model for 12 hours | आदर्शचा १२ तासात लावला पोलिसांनी शोध

आदर्शचा १२ तासात लावला पोलिसांनी शोध

Next
ठळक मुद्देअपहरणाचा संशय : रेल्वे स्थानकाजवळ सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : अपहरणाचा संशय असलेल्या आदर्श राजा महानंदे (११) विद्यार्थ्याचा अवघ्या १२ तासात शोध घेण्यात नवेगावबांध पोलिसांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१८) घडली.
प्राप्त माहितीनुसार येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय वसाहतीत राहणारा आदर्श महानंदे हा येथील बीएडी विद्यालयात ६ व्या वर्गात शिकत आहे. तो सोमवारी (दि.१८) सकाळी ७.३० वाजता शाळेत गेला मात्र तो रात्रीपर्यंत घरी परतलाच नाही. त्याची आई रंजीता महानंदे यांनी त्याचा गावात आजूबाजूच्या गावात शोध घेतला. पण तो सापडला नाही. शेवटी मध्यरात्री रंजीता व तिचे पती राजा यांनी १२ वाजता नवेगावबांध पोलीस स्टेशन येथे त्यांच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपराध क्रमांक २७/२०१९ कलम भादंवि ३६३ अन्वये तक्रार नोंदविली. गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कवले पोलीस हवालदार मारवाडे, परशुरामकर, शिपाई ताराम, मिसार कोकाडे, कोटांगले, रुद्रावाड या आपल्या साथीदारासह संपूर्ण नवेगावबांध व परिसरात शोधाचक्र फिरविले. राष्टÑीय उद्यान परिसर गोंडउमरी, देवलगाव, मुंगली, भिवखिडकी परिसरात शोध मोहीम राबविली. मंगळवारी (दि.१९) सकाळपासूनच नवेगावबांध येथील रेल्वे स्टेशनवर पोलीस तैनात करुन नजर ठेवली. दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास आदर्श रेल्वे स्टेशनजवळील एका घराजवळ आढळला. पोलीस पथकाने सदर मुलाला ताब्यात घेऊन त्याची समजूत काढून त्याला आाई-वडिलांच्या ताब्यात दिले.तेव्हा आदर्शच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

Web Title: The police searched the model for 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.