जिल्ह्यात राहणार फिरते पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:17 PM2019-03-05T21:17:38+5:302019-03-05T21:19:26+5:30

सामान्य माणूस किंवा महिला यांच्यात पोलिसासंदर्भात दहशत असते ती दहशत राहू नये,यासाठी गावागावात, खेड्यावर, टोल्यावर फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम राबविला येणार आहे.

Police Station Thane resides in the district | जिल्ह्यात राहणार फिरते पोलीस ठाणे

जिल्ह्यात राहणार फिरते पोलीस ठाणे

googlenewsNext
ठळक मुद्देविनीता शाहू : अवैध धंद्यांना लावणार चाप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सामान्य माणूस किंवा महिला यांच्यात पोलिसासंदर्भात दहशत असते ती दहशत राहू नये,यासाठी गावागावात, खेड्यावर, टोल्यावर फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम राबविला येणार आहे. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी फिरते पोलीस ठाणे (मोबाईल पोलीस ठाणे) ही संकल्पना गोंदिया जिल्ह्यात राबविणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी (दि.५) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वी भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना ज्या धर्तीवर काम केले त्याच धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातही काम करणार आहे. महिलांचे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे असोत किंवा अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण असो यावर जनजागृती व समुपदेश करणार आहोत. वृध्दांच्या समस्या मार्गी लावणार आहोत. फिरते पोलीस ठाण्यात एक अधिकारी दोन कर्मचारी राहणार आहेत.
हेल्मेट सक्तीपेक्षा हेल्मेट सुरक्षेचे आहे हे समजून स्वयंस्फूर्तीने घालायला हवे असे त्यांनी सांगितले. हेल्मेट किती महत्त्वाचे आहे यासंदर्भात त्यांनी विविध दाखले दिलेत. गोंदिया जिल्ह्यातून चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. त्यावर आळा घालण्यात येणार आहे.
जुन्या पोलीस अधीक्षकांचा आॅपरेशन आॅल आऊट हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार आहे. गोंदियात नकली औषधांपासून अनेक नकली साहित्य तयार होतात. त्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
गोंदिया शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, बंद असलेल्या ट्राफीक सिग्नलकडे लक्ष वेधल्या गेले. शहरातील घडामोडींवर लक्ष घालण्यासाठी १३० कॅमेरे लवकरच लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस कल्याण निधीकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्यांनी पोलीस कल्याण निधीसाठी विविध संकल्पना असून पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी भंडारासारखे गोंदियातही प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या. या वेळी तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी चांदा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे उपस्थित होते.

Web Title: Police Station Thane resides in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस