पोलीस होणार तणावातून मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2017 01:00 AM2017-05-10T01:00:54+5:302017-05-10T01:00:54+5:30
शिस्त, गस्त व बंदोबस्तात नेहमीच मशगूल राहणाऱ्या पोलिसांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपर टेंशन
पोलीस कल्याणासाठी प्रयत्न: नातेसंबंध कसे जपावे यावर मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिस्त, गस्त व बंदोबस्तात नेहमीच मशगूल राहणाऱ्या पोलिसांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपर टेंशन, अशा विविध आजारांना सामोरे जावे लागते. सतत तणावात राहणाऱ्या पोलिसांना कामे करतानाही तणावमुक्ती कशी होऊ शकते. यावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पुणे येथील ट्रेस रिलीज फाऊंडेशन येथील संस्थापक अशोक देशमुख यांना पाचारण केले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यक्ती म्हणून ओळख असलेले अशोक देशमुख गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस जिल्हा पोलिसांना तणावमुक्ती कशी करायची यावर प्रात्याक्षीक व सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
१० मे रोजी देवरीच्या उपमुख्याखलयात २२५ पोलिसांना तर ११ मे रोजी २५० पोलिसांना गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात २५० पोलिसांना तणावमुक्तीवर मार्गदर्शन करणार आहेत. पोलिसांना तणाव निर्माण होण्याची कारणे, तो दुर कसा करायचा, जीवनाचा समतोल कसा साधायचा, दैनंदिन जीवनात मुलाचे वडीलाशी नाते कसे असावे, पत्नीचे नाते पतीशी कसे असावे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नाते एकमेकांशी कसे असायचे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पोलीस कल्याणासाठी सदर उपक्रम पोलीस अधीक्षकांनी सुरु केला आहे. पोलिसांनी अधिक संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.