गुन्हा घडूच नये यासाठी पोलीस राहणार सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 09:37 PM2019-07-13T21:37:57+5:302019-07-13T21:38:56+5:30

शिस्त, गस्त व बंदोबस्त यात जीवन घालविणाऱ्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असते. सर्वात मोठी जबाबदारी सांभाळतांना त्यांच्यावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. अनेकवेळा जनता आणि पोलीस अशी दुफळी निर्माण होते.

The police will be ready to stop the crime | गुन्हा घडूच नये यासाठी पोलीस राहणार सज्ज

गुन्हा घडूच नये यासाठी पोलीस राहणार सज्ज

Next
ठळक मुद्देठाणेदार चव्हाण घेतील पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची वेळेवर नोंद

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिस्त, गस्त व बंदोबस्त यात जीवन घालविणाऱ्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असते. सर्वात मोठी जबाबदारी सांभाळतांना त्यांच्यावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. अनेकवेळा जनता आणि पोलीस अशी दुफळी निर्माण होते. हे होऊ नये लोकाभिमुख प्रशासन चालवे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण म्हणाले.
नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील आमगाव हे पोलीस ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांपैकी एक मानले जाते.येथील जनतेने ज्या पोलीस अधिकाऱ्याला साथ दिली त्याला चांगली साथ मिळते. ज्या पोलीस अधिकाºयाला असहकार्य मिळते त्याला निलंबनालाही सामोरे जावे लागते. पोलीस ठाण्याच्या कारभार सांभाळण्याची जबाबदारी १३ वर्षापासून पोलीस दलात अविरत सेवा देणाºया पोलीस निरीक्षक सुभाष सदाशिव चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली. १३ वर्षापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सहभागी झालेल्या सुभाष चव्हाण यांच्यावर आमगाव पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली. लोकमतने घेतलेल्या त्यांच्या या मुलाखतीत त्यांनी नागरिकांच्या तक्रारीला वेळेवर नोंदणी करू,जेणे करून त्या प्रकरणात तपासाला गती मिळेल आणि पिडीतेला न्याय मिळेल असे सांगितले.
पोलीस प्रशासन लोकाभिमुख राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेत प्रथम प्राधान्य सुव्यवस्थेला देतो. सुव्यवस्था असली तर कायद्याचे राज्य निर्माण होते. गुन्हे प्रतिबंधक आपल्याला संकल्पना राबवायची आहे. सतर्कता ठेवल्यास अनेक गुन्हे सहजरित्या टाळता येतात. ते गुन्हे घडूच नये यासाठी आपण आणि आपली पोलीस यंत्रणा काम पाहणार आहे. बºयाचदा गुन्हा घडल्यानंतर पोलीस घटनास्थळावर जातात. परंतु गुन्हा घडण्याची शक्यता असल्यास त्या ठिकाणी आधीच पोलीस पोहचली तर गुन्हा घडायला वाव राहात नाही. गुन्ह्यांना आळा बसावा यावर जोर दिला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने राज्यात आपले नाव लौकीक केले आहे. गावातील भांडण तंटे गावातच सामोपचाराने सोडविता यावे यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घ्यावा. जातिय सलोखा कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. समाजात धार्मिक, जातिय, हिंदू-मुस्लीम असे तेढ निर्माण होऊच नये यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावेत. गुण्यागोविंदातून लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा हातभार लावण्यासाठी जनता आणि पोलीस यांच्यात सलाख्याचे संबध कायम ठेवण्यात यशस्वी राहू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्यासाठी, या अवैध धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविण्यासाठी आपण व पोलीस यंत्रणा प्रयत्न करेल. जनतेच्या समस्या, गाऱ्हाणी यांचे निराकरण वेळेवर करण्यावर भर दिला जाणार आहे. आमगाव तालुक्यातील सर्व गावे शांततेचे पुरस्कर्ते व्हावेत, तंटामुक्त झालेल्या गावात तंटे नकोत यासाठी भांडण-तंटे घडूच नये यासाठी लोकांना मार्गदर्शन करून गावाला शांततेतून समृध्दीकडे जाण्याच्या मार्गात पोलीस विभागही त्यांच्या मदतीला आहे. बेरोजगार तरूणांना जीद्द, चिकाटीतून पुढे कसे जाता येते यावर मार्गदर्शन करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊ,इतकेच नव्हे तर पोलीस प्रशासनाचे ब्रीद असलेल्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ चे तंतोतंत पालन करून गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा व्हावीच या दिशेने आपले कामकाज असणार असल्याचे आमगावचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण म्हणाले.

Web Title: The police will be ready to stop the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस