एक लाख बालकांना देणार पोलिओ डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:16 PM2018-03-08T22:16:29+5:302018-03-08T22:16:29+5:30

देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Polio dosage to one lakh children | एक लाख बालकांना देणार पोलिओ डोज

एक लाख बालकांना देणार पोलिओ डोज

Next
ठळक मुद्देअभिमन्यू काळे : ११ मार्च रोजी पोलिओ लसीकरण

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या दुसऱ्या टप्प्याचे योग्य नियोजन करु न पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ५ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा टास्कफोर्स समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरु न ते बोलत होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.अभिमन्यू पावडे, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.एस.पाटील भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) बी.डी.पारखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
रविवारी (दि.११) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील १ लाख ६ हजार ११४ बालकांना पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ८५४५९ आणि शहरी भागातील २०६५५ बालकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक गावात, टोले, वाडे, शाळेत, अंगणवाडी, बसस्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
सन १९९५ पासून राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्यात येते.
ही मोहिम यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा दक्षतापूर्वक काम करीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हा टास्कफोर्स समितीच्या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सादरीकरण उपसंचालक आरोग्य सेवा नागपूरचे प्रतिनिधी डॉ.साजीद व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले.
सभेचे संचालन आरोग्य सहायक ए.एस.वंजारी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले.

Web Title: Polio dosage to one lakh children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.