रूग्णालयाच्या शासकीय जागेवर राजकीय डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:52 AM2018-04-04T00:52:23+5:302018-04-04T00:52:49+5:30
तालुक्यातील मुख्य शहराच्या मध्यभागात नगर परिषद परिक्षेत्रात शासकीय जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या भूखंडावर राजकीय पुढारी व जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांचा....
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील मुख्य शहराच्या मध्यभागात नगर परिषद परिक्षेत्रात शासकीय जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या भूखंडावर राजकीय पुढारी व जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांचा राजकीय डोळा असल्याने या जागेवर व्यापारी गाळे तयार करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रुग्ण सेवा आक्सिजनवर आली आहे.
नगर परिषद परिक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केद्र बनगाव आरोग्य सेवेसाठी तत्परतेने पुढे येत आहे. रुग्णालयील रुग्णसेवा वर्षातील सेवेचा व्याप वाढवित अनेक उपाययोजना रुग्णांसाठी कार्यान्वित करीत आहे.
सदर रुग्णालयाची मूर्ती लहान पण किर्ती महान आहे. महिला व बालकांसाठी रुग्णालयातील सेवा तत्परतेने पुढाकार घेत आहेत. आवश्यक सुविधा अपुºया असून सुध्दा रुग्णांना मुबलक उपचार व सुविधा देण्यासाठी रुग्णालय प्रशासन पुढाकार घेताना दिसत आहे.
रुग्णालयात अद्यावत प्रयोगशाळा, औषधी, भांडार कक्ष, आंतररुग्ण कक्ष, बाह्यरुग्ण कक्ष, अतिदक्षता कक्ष, साथीच्या रुग्णांसाठी कक्ष, प्रसूती महिलांसाठी स्वतंत्र कक्ष यासह कार्यालयीन विभागातील कक्ष तर सेवा देणाºया वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कक्ष यासाठी नवीन प्रशस्त इमारतीची आवश्यकता आहे. परंतु या सुविधा उपलब्ध नसूनही रुग्णसेवा कार्यरत आहे. हे या रुग्णालयाचे दुखने असूनही रूग्णालयाचे मोठेपण दिसत आहे. रुग्णालय परिसरात तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेही कार्यालय आहे. या कार्यालयात विविध कक्षाची आवश्यकता आहे. परंतु जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव व निधी मिळत नाही.
रुग्णालय परिसरात रुग्णालय इमारतीला मोकळी जागा सहा मीटरपर्यंत आहे. परंतु रुग्णालय सेवेसाठी महत्वपूर्ण जागेवर व्यापारी गाळे बांधकाम करण्यात येत आहेत. त्यामुळे तातडीच्या सेवेतील अॅम्बुलंस व स्ट्रेचर नेण्यासाठी जागाच उरली नाही. व्यापारी गाळे बांधकामामुळे रुग्णांना दोन मीटर जागेतूनच रुग्णालयात औषधोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्षात जावे लागणार आहे. त्यामुळे व्यापारी गाळे बांधकाम रुग्णांसाठी व उपचार सेवेसाठी डोकेदुखी ठरली आहे. राजकीय पुढारी व जिल्हा परिषद प्रशासन या जागेवर आवश्यक नसतानाही व्यापारी गाळ्यांच्या माध्यमाने रूग्णसेवा बाधित करीत आहे. याविरूध्द नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून शासनाकडे तक्रार दाखल केली आहेत. शासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.