१४३ केंद्रांवर आज मतदान

By admin | Published: January 8, 2017 12:12 AM2017-01-08T00:12:40+5:302017-01-08T00:12:40+5:30

गेल्या महिनाभरापासून सुरू अस९लल्या नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला शनिवारी (दि.७) रात्री विराम लागला.

Polling at 143 centers today | १४३ केंद्रांवर आज मतदान

१४३ केंद्रांवर आज मतदान

Next

३५८ बॅलेट युनिट्स : १,१५,६०७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
गोंदिया : गेल्या महिनाभरापासून सुरू अस९लल्या नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला शनिवारी (दि.७) रात्री विराम लागला. रविवारी (दि.८) शांततेत मतदान करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये गोंदियात १४३ मतदान केंद्रांवरून मतदान केले जाणार असून शहरातील १,१५,६०७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रविवारी होत असलेल्या मतदान प्रक्रीयेसाठी प्रशासन कामाला लागले आहे. शनिवारी निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना शासकीय तंत्रनिकेतनमधून साहित्य वाटप करण्यात आले.
मागील २० दिवसा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला होता. १७ डिसेंबर रोजी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापासूनच निवडणुकीचे रंग पकडला होता. आता निवडणूक शेवटच्या टप्यात आली असून रविवारी (दि.८) मतदान केले जाणार आहे. मतदानाच्या या प्रक्रीयेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
शहरात १४३ मतदान केंद्रांवरून मतदानाची प्रक्रीया केली जात आहे. यात ३५८ बॅलेट युनिट्स लागणार असून प्रत्येक केंद्रावर चार कर्मचारी व एक पोलीस लावले जाणार आहेत. यात एक केंद्र प्रमुख व तीन सहकारी राहतील. अशाप्रकारे एकूण ५७२ कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली असल्याची माहिती आहे. मतदानाची प्रक्रीय रविवारी (दि.८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान घेतली जाणार आहे.
विशेष म्हणजे शहरातील २१ प्रभागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत उमेदवारांची संख्या बघता बॅलेट युनिट्स लावण्यात आले आहेत. यात प्रभाग क्रमांक १, २, ३, ५, १२, १३, १५, १६, १८, २० आणि २१ या एकूण ११ प्रभागांत ३ बॅलेट युनिट लावण्यात आले आहेत. तर प्रभाग क्रमांक ४, ६, ७, ८, ९, १०, ११, १४, १७, १९ या एकूण १० प्रभागांत २ बॅलेट युनिट्स लावण्यात आले आहेत.

- अनेकांनी केला आचारसंहितेचा भंग
बसपाचे अध्यक्षपदाचे उमेदवार पंकज यादव (५०) व त्यांचे भाऊ लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव (४०) यांनी शुक्रवारी रात्री ९.४० वाजता सिंधी कॉलनी, शंकर नगरात प्रचारसभा घेतली. त्या सभेची परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर भादंविच्या कलम १८८ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आंबाटोली रमाबाई आंबेडकर वॉर्ड रेल्वे चौकीजवळील हनुमान मंदिराच्या चावडीवर मतदारांना आमिष देऊन आचारसंहितेचा भंग केल्याने नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे यांच्या तक्रारीवरून सुनील देवाजी भालेराव यांच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १५३ (अ) ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्रभाग क्र.१४ च्या अपक्ष उमेदवार मंगला विष्णु नागरिकर (३५) रा.छोटा गोंदिया यांनी छोटा गोंदियाच्या दुर्गा मंदिरासमोर परवानगी न घेताच प्रचारसभा घेतली. त्यामुळे त्यांच्यावर भादंविच्या कलम १८८ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Polling at 143 centers today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.