गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४ बुथवरील मतदान ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 04:06 PM2018-05-28T16:06:36+5:302018-05-28T16:06:56+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदानासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात ईव्हीएम बंद पडल्यामुळे ३४ बुथवरील मतदान प्रक्रिया बंद असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सोमवारीे (दि.२८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

Polling in 34 booths in Gondia assembly polls are stopped | गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४ बुथवरील मतदान ठप्प

गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४ बुथवरील मतदान ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देउपविभागीय वालस्कर यांची माहिती१४१ बुथवरील मशीनमध्ये बिघाड 

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदानासाठी गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. मात्र यापैकी ७५ बुथवरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनबंद असल्याच्या १४१ तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये बिघाड आला. काही ठिकाणच्या ईव्हीएम मशीन बदलविण्यात आल्या. परंतु मोठ्या प्रमाणात ईव्हीएम बंद पडल्यामुळे ३४ बुथवरील मतदान प्रक्रिया बंद असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सोमवारीे (दि.२८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
गोंदिया विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी ३४५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या बुथवर ३७९ ईव्हीएम मशीन व ४१४ व्हीव्हीटीपॅट मशिन देण्यात आले होते. सोमवारी सकाळपासूनच मतदान केंद्रावरून ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. परंतु ज्या ठिकाणच्या तक्रारी आल्या त्या ठिकाणी तांत्रीक अधिकारी जाऊन त्यांनी बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक विभागाच्या निदेर्शानुसार ज्या ठिकाणी एकदा मतदान सुरू झाले. तसेच मध्येच बिघाड झाला तर ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीटीपॅट दुरूस्त न करता संपूर्ण सेटच नवीन लावण्याचे निर्देश दिले. परंतु गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅटमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड आला. या विधानसभा क्षेत्रात फक्त १० टक्के ईव्हीएम मशीन अतिरिक्त असल्यामुळे ३४ बुथवरील मतदान बंदच राहीले.ईव्हीएम मशीन व व्हीव्हीटीपॅट उपलब्ध नसल्यामुळे मतदान सुरूच करता आले नाही. सुरूवातील ३५ केंद्रावरील मतदान बंद होते. परंतु प्रशासनाने बुथ क्र. १६६ सरस्वती महिला विद्यालय गोंदिया येथील मशीन दुरूस्त करून मतदान प्रक्रिया पुर्ववत करण्यात आली. ईव्हीएम मशीन किंवा व्हीव्हीटीपॅटमध्ये आलेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी ५ अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणात बिघाड आल्यामुळे अनेक ठिकाणी अभियंत्यांना पोहचायला वेळ लागणार होता. व्हीव्हीटीपॅटच्या लिंक एरर च्या ९० टक्के तक्रारी असल्याचे वालस्कर यांनी सांगितले. 

या बुथवरील मतदान बंद
बुथ क्र.१६ जि.प.हिंदी प्राथमिक केंद्रीय शाळा काटी, बुथ क्र.३३ जि.प. हिंदी प्राथमिक केंद्रीय शाळा बनाथर, बुथ क्र.३५ जि.प. हिंदी माध्यमिक शाळा बघोली, बुथ क्र.३६ जि.प. हिंदी माध्यमिक बघोली, बुथ क्र.४३ जि.प. हिंदी प्राथमिक शाळा बिरसी, बुथ क्र.४४ जि.प. हिंदी प्राथमिक शाळा रायपूर, बुथ क्र.५० जि.प. प्राथमिक शाळा सोनपूरी, बुथ क्र.५२ जि.प. प्राथमिक शाळा लोहारा, बुथ क्र.९४ जि.प. उच्च प्राथमिक शाळा रतनारा, बुथ क्र.१०९ जि.प. मराठी प्राथमिक केंद्रीय शाळा अजुर्नी, बुथ क्र.११५ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.११६ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.११७ जि.प. मराठी उच्च केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा, बुथ क्र.१२० जि.प. हिंदी प्राथमिक शाळा झिलमिली, बुथ क्र.१२३ जि.प.हिंदी माध्यमिक शाळा लंबाटोला-गिरोला, बुथ क्र.१२७ जि.प. हिंदी माध्यमिक शाळा पांजरा, बुथ क्र.१३५ जि.प. मराठी  प्राथमिक शाळा कटंगीकला, बुथ क्र.१३८ जि.प. मराठी माध्यमिक मुले मुली शाळा कटंगीकला, बुथ क्र.१६९ बी.एच. जे. कॉलेज गोंदिया, बुथ क्र.१९४ मनोहर म्युनिसीपल हायर सेकेंडरी स्कूल गोंदिया, बुथ क्र.१९५ महावीर मारवाडी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२०० एन. पी. मराठी प्राथमिक शाळा सिव्हील लाईन गोंदिया, बुथ क्र.२०६  जे. एम. हायस्कूल सिव्हील लाईन गोंदिया, बुथ क्र.२१५ श्री गुरूनानक प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२१८ बी. एन. आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल गोंदिया, बुथ क्र.२२५ एन.पी. मराठी गणेशनगर गोंदिया, बुथ क्र.२३३ माताटोली म्युनिसिपल हायस्कूल गोंदिया, बुथ क्र.२४० एन.पी. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा गोंदिया, बुथ क्र.२५० एन.पी. मराठी हिंदी मालवीय शाळा गोंदिया, बुथ क्र.२५३ सरस्वती शिशू मंदिर मूर्री रोड गोंदिया, बुथ क्र.२७१ संत तुकाराम हायस्कूल कुडवा नाका गोंदिया, बुथ क्र.२७६ मनोहर म्युनिसीपल हायस्कूल इंग्लिश गोंदिया, बुथ क्र.२७६ (ए) अनाग्रीकर धम्मपाल सार्वजनिक वाचनालय गोविंदपूर गोंदिया, बुथ क्र.३०३ (ए) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलचूरपेठ गोंदिया येथील मतदान बंद आहे.

Web Title: Polling in 34 booths in Gondia assembly polls are stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.