बाजार समित्यांसाठी मतदान केंद्र झाले ‘फायनल’, २८ अन् ३० एप्रिल असे दोन टप्पे

By कपिल केकत | Published: April 23, 2023 06:41 PM2023-04-23T18:41:43+5:302023-04-23T18:42:00+5:30

गोंदिया जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे.

Polling stations for market committees became final, two phases namely 28th and 30th April | बाजार समित्यांसाठी मतदान केंद्र झाले ‘फायनल’, २८ अन् ३० एप्रिल असे दोन टप्पे

बाजार समित्यांसाठी मतदान केंद्र झाले ‘फायनल’, २८ अन् ३० एप्रिल असे दोन टप्पे

googlenewsNext

गोंदिया : जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. यातील देवरी बाजार समिती अविरोध झाल्याने आता उरलेल्या सहा बाजार समित्यांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यातील चार बाजार समितींसाठी शुक्रवारी (दि. २८) रोजी तर दोन बाजार समितींसाठी रविवारी (दि. ३०) मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्र ठरविण्यात आले असून, त्यानुसार तयारी सुरू झाली आहे.

राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहेत. यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीला वेळ असून, बाजार समित्यांची निवडणूक तोंडावर आली आहे. जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, आमगाव व देवरी या सात बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. यातील देवरी बाजार समितीची निवडणूक अविरोध आटोपली असल्यामुळे आता उरलेल्या सहा बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीला घेऊन उमेदवार व नेते मंडळी प्रचारात व्यस्त झाली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीला घेऊन निबंधक कार्यालय सुद्धा व्यस्त आहे. निवडणुकीला निबंधक कार्यालयाकडून मतदान केंद्रांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली असून, निबंधक कार्यालयाकडून तशी तयारी सुरू झाली आहे.

असे राहणार मतदान केंद्र

  • - गोंदिया बाजार समिती : गोंदिया बाजार समितीत ३८६१ मतदार असून, त्यांच्यासाठी शहरातील मनोहरभाई पटेल म्युनिसिपल हायस्कूल, दवनीवाडा येथील जिल्हा परिषद शाळा व रावणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - गोरेगाव बाजार समिती : गोरेगाव बाजार समितीत १२७८ मतदार असून, त्यांच्यासाठी शहीद जान्या-तिम्या हायस्कूलमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - तिरोडा बाजार समिती : तिरोडा बाजार समितीत १९३० मतदार असून, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - आमगाव बाजार समिती : आमगाव बाजार समितीत १६३२ मतदार असून, त्यांच्यासाठी आमगाव येथील जिल्हा परिषद शाळा, ग्राम ठाणा येथील जिल्हा परिषद शाळा, ग्राम कालीमाटी येथील जिल्हा परिषद शाळा व ग्राम अंजोरा येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - अर्जुनी-मोरगाव बाजार समिती : अर्जुनी-मोरगाव बाजार समितीत १४३२ मतदार असून, त्यांच्यासाठी अर्जुनी-मोरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल, नवेगावबांध येथील जिल्हा परिषद हायस्कूल, ग्राम महागाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल व ग्राम केशोरी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.
  • - सडक-अर्जुनी बाजार समिती : सडक-अर्जुनी बाजार समितीत १०७८ मतदार असून, त्यांच्यासाठी सडक-अर्जुनी येथीलच त्रिवेणी हायस्कूल व ज्योती कन्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे.

 
असे होणार मतदान
- देवरी येथील बाजार समितीची निवडणूक अविरोध झाल्यामुळे आता सहा बाजार समित्यांसाठी निवडणूक घेतली जात आहे. यामध्ये गोंदिया, आमगाव, तिरोडा व अर्जुनी-मोरगाव बाजार समितीसाठी शुक्रवारी (दि. २८) मतदान होणार असून, शनिवारी (दि. २९) मतमोजणी होणार आहे. तर गोरेगाव व सडक-अर्जुनी बाजार समितीसाठी रविवारी (दि. ३०) मतदान होणार असून, मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.
 
प्रचाराला झाली सुरुवात
- बाजार समिती मतदानासाठी आता चार-पाच दिवसांचा कालावधी उरला असून, उमेदवार प्रचाराला लागले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढली जात नसून पॅनल तयार करून उतरविले जातात. यामुळे राजकीय पक्षांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी नेते मंडळीसुद्धा मैदानात उतरली आहेत.
 
मतदान केंद्र, संस्था व मतदारनिहाय आकडेवारीचा तक्ता
बाजार समिती- सहकारी संस्था (केंद्र -मतदार)- ग्रापं.संघ (केंद्र -मतदार)- व्यापारी-अडते (केंद्र -मतदार)- हमाल-तोलारी (केंद्र -मतदार)

  1. गोदिंया - ३-७९४/३-१०८५/३-१२०२/२-७८०
  2. गोरेगाव- २-६४६/२-५१४/१-५५/१-६३
  3. तिरोडा- २-८४०/२-८४०/१-१३३/१-११७
  4. आमगाव- ४-६०३/४-४८७/१-२४५/१-२९७
  5. अर्जुनी-मोरगाव- ४-४७५/४-६४७/१-८०/१२३०
  6. सडक-अर्जुनी- १-३२१/१-५६१/१-१८१/१-१५

Web Title: Polling stations for market committees became final, two phases namely 28th and 30th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.