पीओएस अंमलबजावणी जिल्हा राज्यात सलग अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:43 AM2018-11-15T00:43:43+5:302018-11-15T00:44:22+5:30

स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व एकही पात्र शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी एप्रिल २०१७ पासून पार्इंट आॅफ सेलद्वारे (पीओएस) स्वस्त धान्याचे वितरण सुरू करण्यात आले.

POS execution is the top in the district state | पीओएस अंमलबजावणी जिल्हा राज्यात सलग अव्वल

पीओएस अंमलबजावणी जिल्हा राज्यात सलग अव्वल

Next
ठळक मुद्दे९९८ स्वस्त धान्य दुकांनाना पीओएस मशीन : शंभर टक्के आधार लिंकींग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी व एकही पात्र शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी एप्रिल २०१७ पासून पार्इंट आॅफ सेलद्वारे (पीओएस) स्वस्त धान्याचे वितरण सुरू करण्यात आले.
आदिवासी बहुल व दुर्गम समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याने या प्रणालीचे शंभर टक्के अंमलबजावणी करुन सलग पाचव्या महिन्यात राज्यात अव्वल स्थान कायम ठेवले आहे. जिल्ह्यात एकूण ९९८ स्वस्त धान्य दुकानदार असून ७७ हजार १८१ अंत्योदय शिधापत्रिकाधारक, ९० हजार केसरी शिधापत्रिकाधारक व ६ लाख ६४ हजार प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आहे.
या शिधापत्रिकाधारकांना शासनाने ठरवून दिल्यानुसार दर महिन्याला स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. मात्र बºयाच गावांमध्ये स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या व स्वस्त धान्य दुकानदारांबाबत शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी होत्या. शिवाय स्वस्त धान्य दुकानातील अन्न धान्याचा काळाबाजार केला जात होता.
यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांना आधारलिंक केले. त्यानंतर यात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी पीओएस प्रणालीव्दारे स्वस्त धान्याचे शिधापत्रिकाधारकांना वितरण सुरू केले.
यासाठी जिल्ह्यातील सर्व ९९८ शिधापत्रिकाधारकांना पीओएस मशिनचे वाटप केले. या मशिनला थेट जिल्हा पुरवठा विभागाशी कनेक्ट केले. दरम्यान सालेकसा, देवरी तालुक्यातील काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे सुरूवातीला अडचण निर्माण झाली होती. ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही त्या ठिकाणी त्यांनी आॅफलाईन वितरण व्यवस्था सुरू केली.
यामुळे पीओएस प्रणालीव्दारे स्वस्त धान्याचे वितरण करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले. त्यामुळे मागील पाच महिन्यापासून गोंदिया जिल्हा पीओएस प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात शंभर टक्के अव्वल ठरला आहे.
विशेष म्हणजे मागील पाच महिन्यापासून पीओएस प्रणालीव्दारे स्वस्त धान्याचे वितरण करण्यात गोंदिया जिल्ह्याची घौडदोड कायम आहे.
मे महिन्यात ८६ टक्के, जून ८९ टक्के, जुलै ९१ टक्के, आॅगस्ट ९२ टक्के, आॅक्टोबर ९२ आणि नोव्हेबंर महिन्यात ९४ टक्के स्वस्त धान्याचे वितरण पीओएस प्रणालीव्दारे करुन जिल्ह्याने राज्यात अवल्ल स्थान कायम ठेवल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांनी सांगितले.
पोर्टेब्लिटीची सुविधा
शिधापत्रिका आधारलिंक व पीओएस प्रणालीशी सलग्न करण्यात आल्याने शिधापत्रिकाधारकांना कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्याची उचल करण्यास मदत झाली. दरम्यान या पोर्टेब्लिटीची सुविधेचा आत्तापर्यंत जिल्ह्यातील १८५१ शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला. शिवाय यामुळे स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी सुद्धा दूर झाल्या.
शिधापत्रिकाधारकांना मिळणार
तूरडाळ, साखर दिवाळीनिमित्त प्राधान्य गटातील आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने प्रती कार्ड १ किलो साखर, १ किलो तुरडाळ, १किलो चनाडाळ आणि १ किलो उडीद वाटप करण्याचा निर्णय घेतला यासाठी जिल्ह्याला १५०० क्विंटल तूरडाळ व चणाडाळीचा साठा मंजूर करण्यात आला आहे. लवकरच याचे स्वस्त धान्य दुकानातून वाटप केले जाणार आहे.
७७ गावे इंटरनेटपासून वंचित
जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये अद्यापही इंटरनेटची सुविधा नसल्याने या गावात पीओएस प्रणालीची अंमलबजावणी करण्यास अडचण निर्माण झाली. मात्र यानंतरही जिल्हा पुरवठा विभागाने यावर मात करीत जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीओएस प्रणालीची ९४ टक्के अंमलबजावणी करुन शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करुन दिले.

Web Title: POS execution is the top in the district state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.