वनरक्षक व पदोन्नत वनपालांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

By admin | Published: September 23, 2016 02:09 AM2016-09-23T02:09:28+5:302016-09-23T02:09:28+5:30

वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या गोंदिया शाखेच्या वतीने वन्यजीव विभाग गोंदियाच्या कार्यालयात

Positive discussions on the demands of the preservative and promoted pensioners | वनरक्षक व पदोन्नत वनपालांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

वनरक्षक व पदोन्नत वनपालांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

Next

गोंदिया : वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या गोंदिया शाखेच्या वतीने वन्यजीव विभाग गोंदियाच्या कार्यालयात वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक रविकरण गोवेकर व उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्यासोबत दालनात वनरक्षक व वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, केंद्रीय संघटक नागपूर एल.टी. उचीबगले यांच्या नेतृत्वात वनरक्षक व वनपालांच्या समस्या निवारण संबंधात चर्चा करण्यात आली. त्यात संघटनेची समस्या, निवारण समितीसोबत झालेल्या चर्चेनंतर उपवनसंरक्षकांनी सोडविण्याचे मान्य केले.
कर्मचाऱ्यांचे वेतन शासकीय नियमाप्रमाणे महिन्याच्या ५ तारखेला करण्याचे मान्य केले. कर्मचाऱ्यांना सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत पुरविणार, बदली प्रवास भत्ता, वैद्यकीय बिल, एल.टी.सी. देयकांना वेळेवर अनुदान देण्याचे मान्य करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची देखभाल व दुरूस्ती करण्याचे व नवीन निवासस्थाने तयार करण्याचेही मान्य करण्यात आले. घरबांधणी, संगणक व वाहन अग्रीम योजनेनुसार प्राप्त अर्जावर तत्काळ कार्यवाही, बारमाही व स्थायी वनमजुरांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचे चर्चेदरम्यान मान्य करण्यात आले.
या संयुक्त सभेत डी.जी. कुशवाह, वृत्तीय अध्यक्ष नागपूरचे एस.एन. खोब्रागडे, केंद्रीय सदस्य भंडारा शाखेचे अध्यक्ष ईरशादअली मेहमुदअली, तसेच वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे पदाधिकारी राकेश ब्राम्हणे, अध्यक्ष एल.आर. लिल्हारे, सचिव एम.डब्ल्यु. भांडारकर, कार्याध्यक्ष पठाण, एस.पी. यादव, वाय.बी. सोनटक्के, आर.ओ. दशरिया, व्ही.एस. कागदीमेश्राम, एल.एस. अग्निहोत्री, के.ए. जोहाशेख, डी.एस. थेर, एस.एल. नागपुरे, जी.एस. रहांगडाले, ए.एस. बोरकर व इतर सभासद उपस्थित होते. आर.व्ही. ब्रम्हणे यांनी आभार मानले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Positive discussions on the demands of the preservative and promoted pensioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.