पॉझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:03+5:302021-07-08T04:20:03+5:30
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. ७) १०९८ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८२५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २७३ नमुन्यांची ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. ७) १०९८ स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८२५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २७३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी १ नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.०९ टक्के आहे. बुधवारी जिल्ह्यात ५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर एका नवीन रुग्णाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून कोरोनाला पूर्णपणे उतरती कळा लागली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १९९५८० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १७४४९९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २१८६७० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९७५९७ नमुने निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत ३१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
..............
तीन तालुके कोरोनामुक्त
जिल्ह्यातील तिरोडा, देवरी, सडक अर्जुनी हे तीन तालुके कोरोनामुक्त झाले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात केवळ एकच कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे, तर उर्वरित चार तालुक्यात सुध्दा पाच ते सहाच रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.