रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:42+5:302021-04-29T04:21:42+5:30

तालुका निर्मितीसाठी दोन दशकांपासून संघर्ष केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग म्हणून केशोरी या गावाची जिल्ह्यात ओळख ...

Possibility of accidents due to potholes on roads | रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता

googlenewsNext

तालुका निर्मितीसाठी दोन दशकांपासून संघर्ष

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग म्हणून केशोरी या गावाची जिल्ह्यात ओळख आहे. तालुका निर्मितीसाठी आवश्यक असलेला परिसर व लोकसंख्या तथा भौगौलिक परिस्थिती तालुका निर्मितीच्या निकषाची पूर्तता करीत आहे. यामुळे तालुका निर्मिती व्हावी यासाठी गेल्या दोन दशकांपासून सतत तालुका निर्मिती संघर्ष समितीचा शासनाकडे लढा सुरू आहे. परंतु जे शासन सत्तेवर येते ते आश्वासनाच्या लालीपॉपशिवाय काहीच देत नाही. यामुळे या भागातील नागरिक शासनाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

गोंदिया : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते; मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे. ग्रामीण रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा लाेकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे करण्यात येते; मात्र रस्ता दुरुस्ती करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

वनविभागाच्या निवासाची दुरवस्था

गोंदिया : वन कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून निवासस्थान तयार केले; मात्र नियोजनाअभावी या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. लाकूड आगार गडेगाव येथे असलेले निवासस्थान भुईसपाट झाले आहे. येथील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता तालुका किंवा जिल्हास्थळी राहतात.

बालमजूर कायदा नावापुरता

आमगाव : अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू असतानाच जिल्ह्यात पुन्हा ठिकठिकाणी बालमजूर काम करीत असल्याचे दिसून येत आहे. परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्याने या बालकांची अवस्था समजून घ्यायला कुणीही वाली नाही. सक्तीच्या शिक्षणाचा उदोउदो होत असताना बालके शाळाबाह्य राहणार असल्याचीही भीती व्यक्त होत आहे. आर्थिक परिस्थितीने खचलेल्या कुटुंबांतील चिमुकल्यांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन तुटपुंज्या वेतनावर राबविणाऱ्या मालकांनीच बालमजुरी कायदा खिशात कोंबला आहे.

गावकरी अडचणीत

नवेगावबांध ­: कोहमारा ते नवेगावबांध-वडसा राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कडा नसल्याने त्रास होत आहे.

आरोग्य सेवेकडे लक्ष देण्याची मागणी

सालेकसा : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहात नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होते.

बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट

सडक-अर्जुनी : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.

वृद्धांची शासकीय कार्यालयात हेळसांड

आमगाव : शासकीय, निमशासकीय कार्यालयांत कामाकरिता जाणाऱ्या वृद्धांना कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळत नाही. विचारल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाही.

सततच्या नुकसानीने शेतकरी धास्तावला

नवेगावबांध : धान पीक उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सतत काहीना काही कारणांमुळे शेतकरी संकटात आला असून चांगलाच धास्तावला आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगरपरिषदेकडे निवेदने देण्यात आली.

Web Title: Possibility of accidents due to potholes on roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.