राखीसाठी पोस्टाचे खास ‘वॉटरप्रुफ लिफाफे’
By admin | Published: August 12, 2016 01:26 AM2016-08-12T01:26:31+5:302016-08-12T01:26:31+5:30
राखीच्या रूपातील बहिणीच्या प्रेमाला सुरक्षितपणे भाऊरायापर्यंत पोहचवून देण्याची जबाबदारी स्वीकारत टपाल विभागाने राखीसाठी खास ‘एनव्हलप’ आणले आहेत.
टपाल विभागाची भेट : प्रेम व आपुलकीची भेट राहणार सुरक्षित
कपिल केकत गोंदिया
राखीच्या रूपातील बहिणीच्या प्रेमाला सुरक्षितपणे भाऊरायापर्यंत पोहचवून देण्याची जबाबदारी स्वीकारत टपाल विभागाने राखीसाठी खास ‘एनव्हलप’ आणले आहेत. पिवळा व गुलाबी या दोन रंगांतील हे लिफाफे वॉटरप्रूफ असून प्रत्येकी सात रूपये दराने टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत.
भाऊ-बहिणीच्या प्रेमाला घट्ट करणारा राखीचा सण आता काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारपेठ राख्यांच्या दुकानांनी सजली असून त्यात विविध प्रकारच्या राख्या दिसून येत आहेत. राखी खरेदीसाठी आता या दुकानांत गर्दी दिसून येत आहे. सुरक्षेचे वचन देणाऱ्या भावाच्या हाताला राखी बांधून बहीण आपली माया प्रकट करते. रेशमाचा साधा दोरा यासाठी पूरेसा असला तरिही काळानुसार राखीच्या प्रकारांत बदल होत गेला आहे. पैशांकडे न बघता बहिणी आपल्या भावासाठी चांगल्यात चांगली राखी खरेदी करतात. यामुळेच राख्यांचे निर्मातेही दरवर्षी वेगवेगळ््या प्रकारच्या राख्या बाजारात मांडतात.
विशेष म्हणजे बहिणीची ही माया तिच्या भावापर्यंत सुरक्षीत पोहचावी यासाठी टपाल विभागाकडून राखीनिमित्त विशिष्ट ‘एनव्हलप’ विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. यंदाही हे लिफाफे टपाल विभागाने विक्रीसाठी आणले आहेत. पिवळा व गुलाबी या दोन रंगात हे लिफाफे येथील टपालघरात उपलब्ध असून प्रत्येकी सात रूपये दराने विक्री केले जात आहेत. वॉटरपू्रफ असलेले लिफाफे आकर्षक असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डायमंड वर्कचे अधिक आकर्षण
राखी म्हणजे रेशमाची साधी डोरही तेवढीच महत्व ठेवते. मात्र आता भावाला राखी बांधणेही फॅशनेबल झाले आहे. बहिणींची ही पसंती बघता आता राख्यांमध्येही आर्टीफिशीयल डायमंड वर्क दिसून येत आहे. हातात बांधण्यात येत असलेल्या ब्रेसलेट सारख्या राख्या आता बाजारात उपलब्ध होत आहेत. रंगबिरंगी डायमंड लावलेल्या राख्या अधिक आकर्षक दिसत असल्याने त्यांची जास्त डिमांड दिसून येत आहे. शिवाय या राख्या आकर्षक पॅकींगमध्ये येत आहेत. त्यामुळे या राख्यांना बघताच समोरची व्यक्ती आकर्षीत होते.
पोस्टावर कुरीअर भारी
पोस्टाद्वारे आपले पत्र असो वा राखीचा लिफाफा, कधी समोरच्या व्यक्तीला मिळणार याचा नेम नसतो. राखीसाठीच्या या लिफाफ्याबाबतही तसेच काही आहे. सात रूपयांचा हा लिफाफा खरेदी केल्यावर त्यावर वजनानुसार स्टॅम्प लावावे लागणार आहे. मात्र तो लिफाफा समोरच्या व्यक्तीला कधी मिळणार याची खात्री नाही. तर कु रीअर मध्ये ही भानगड नसून अंतरानुसार ते चार्ज करून दोन-तीन दिवसांत ते हमखास दिलेल्या पत्यावर पोहचणार असल्याची खात्री नसल्याने सध्या कुरीअर सेवेला नागरिक प्राधान्य देत आहेत.
छोटा भीम व डोरेमोनचीही धूम
सध्या चिमुकल्यांना छोटा भीम व डोरेमोन या कार्टूनचे फॅड लागले आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक साहीत्यांपासून ते कापडांपर्यंत सर्वच वस्तूंवर हे कार्टून्स हवे आहेत. आता राखीच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून येत आहे. चिमुकल्यांची ही पसंती लक्षात घेता बाजारात छोटा भीम, डोरेमोन, बाल हनुमान, एंग्री बर्डच्या राख्यांची धूम दिसून येत आहे.