शेंडा मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:14 PM2017-09-20T22:14:29+5:302017-09-20T22:14:46+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपले जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहे.

Pothole on the peak road | शेंडा मार्गावर खड्डेच खड्डे

शेंडा मार्गावर खड्डेच खड्डे

Next
ठळक मुद्देगवतामुळे घडताहेत अपघात :सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपले जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला वाढलेल्या गवतामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
शेंडा ते सडक-अर्जुनीचे अंतर १४ किमी आहे. सडक-अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे लोकांना कार्यालयीन कामासाठी येथे जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याची दुर्दशा होवून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना आपली बाजू सोडून कधी कधी उजव्या बाजूने वाहन चालवावे लागते. अशावेळी जीव मुठीत धरुन मोठीच कसरत करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यातील सर्व रस्त्यांपेक्षा याच मार्गावर वळणाचे सर्वात जास्त प्रमाण आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने वाढलेले ५ ते ७ फुट उंचीचे गवत आहे. त्यामुळे समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. परिणामी अपघात होवून काहींना जखमी व्हावे लागते. काहींना अपंगत्व तर काहींना जीवसुध्दा गमवावा लागला आहे. याच मार्गावर खोल ढोढीवरील झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
याच पुलापासून शंभर मीटर अंतरावर जीवघेणे वळण असून त्या वळणावर वाढलेल्या गवताच्या जवळ आलेले वाहन दिसत नाही. त्यामुळेच तेथे एकाच महिन्यात ९ अपघात घडले आहेत. त्याचप्रमाणे उशीखेडा गावापासून मार्कंड परिहार यांच्या शेतापर्यंत या रस्त्याची समस्या अधिकच बिकट आहे. रस्त्यावर खड्डे तर आजूबाजूला बोरीच्या काट्या आहेत. चारचाकी वाहन आले तर पायी चालणाºयांना कुठून चालावे असा प्रश्न पडतो. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. या परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरूस्ती मागणी अनेकदा केली. मात्र या विभागाच्या अधिकाºयांनी त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांची समस्या कायम आहे. परिणामी वाहन चालकांना गैरसोयीला समोर जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने परिसरातील नागरिकांच्या समस्येचे दखल घेत रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्याची मागणी केली. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशार या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
 

Web Title: Pothole on the peak road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.