कुंभार मोहल्ला विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:58 AM2017-10-13T00:58:01+5:302017-10-13T00:58:15+5:30
येथील वॉर्ड क्रमांक ५ म्हणजेचे कुंभार मोहल्ला ७० वर्षानंतरही विकासापासून वंचितच आहे. शासन आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील कुंभार नागरिकांच्या समस्या कायम आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : येथील वॉर्ड क्रमांक ५ म्हणजेचे कुंभार मोहल्ला ७० वर्षानंतरही विकासापासून वंचितच आहे. शासन आणि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील कुंभार नागरिकांच्या समस्या कायम आहेत. याची ओरड होत असतानाही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
कुंभार मोहल्ला भागाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास येथे २७० नागरिक वास्तव्यास आहेत. स्थानिक राजकीय पुढाºयांनी या मोहल्ल्यांचा वापर आजपर्यंत केवळ एक व्होट बँक म्हणून केला आहे. कुंभार समाजबांधव या मोहल्ल्यात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र सुख सुविधापासून हा मोहल्ला दुलर्क्षित आहे. या मोहल्यात रस्ता, नाली नाही. त्या वॉर्डातील वापरणारे पाणी हे रस्त्याने वाहते. रस्ता नसल्याने येथील नागरिक चिखल तुडवत जावे लागते. येथे वास्तव्यास असलेले नागरिक नरकयातना भोगत आहेत. येथील घाणीमुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या मोहल्यात विद्युत खांब नाही. एक खांब आहे मात्र तोही व्यवस्थित नाही. या समस्या येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीत मांडल्या. मात्र कुणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे कुंभार मोहल्ला हा सुख सुविधा मुलभुत सुविधेपासुन वंचित आहे. यामुळे या भागात विकास कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रस्ते बनविण्याचा सपाटा सुरू आहे. या भागात एखादा रस्ता झाल्यास नागरिकांची समस्या मार्गी लागेल.